क्या बात! अभिनेता सूर्याने राजाकन्नूची खरी पत्नी पार्वतीच्या खात्यात जमा केले १० लाख रूपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:07 PM2021-11-17T15:07:12+5:302021-11-17T15:11:24+5:30

जयभीम (JaiBhim) सिनेमाचा सह-निर्माता आणि मुख्य अभिनेता सूर्या (Actor Surya) याने सिनेमातील राजकन्नूच्या रिअरलाईफ पत्नीला १० लाख रूपये देण्याची घोषणा केली. 

Actor Suriya To Deposit Rs 10 L For Real Life 'Jai Bhim' Victim Rajakannu's Wife | क्या बात! अभिनेता सूर्याने राजाकन्नूची खरी पत्नी पार्वतीच्या खात्यात जमा केले १० लाख रूपये...

क्या बात! अभिनेता सूर्याने राजाकन्नूची खरी पत्नी पार्वतीच्या खात्यात जमा केले १० लाख रूपये...

googlenewsNext

साउथचा सुपरस्टार सूर्या (Actor Surya) 'जयभीम' (Jai Bhim) सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असून काही संघटनांनी या सिनेमावर आता आक्षेप घेतला आहे. अशात एक चांगली बातमी समोर आली. सिनेमाचा सह-निर्माता आणि मुख्य अभिनेता सूर्या याने सिनेमातील राजकन्नूच्या रिअरलाईफ पत्नीला १० लाख रूपये देण्याची घोषणा केली. 

thehindu.com ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी अभिनेता सूर्या याने पार्वती अम्मलच्या खात्यात १० लाख रूपये जमा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. 'जयभीम'ही एक सत्यकथा असून ज्यात एका आदिवासी समाजातील राजकन्नू नावाच्या व्यक्तीचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू कसा झाला हे दाखवलं आहे. 

राजकन्नू याची खरी पत्नी उदरनिर्वाहासाठी मोलमजूरी करत असल्याचं समजल्यावर अभिनेता सूर्या तिला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आला. तिच्या खात्यात १० लाख रूपये जमा करण्यात येतील आणि त्याच्या व्याजावर ती तिचं पोट भरू शकेल अशी व्यवस्था करण्यात आल्याचं समजतं. इतकंच नाही तर त्यानंतर तिच्यानंतर ही रक्कम तिच्या वारसाकडे जाईल याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

साउथचा सुपरस्टार सूर्या इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या  एका संस्थेला १ कोटी रूपयांची मदत केली आहे. सूर्याने ही रक्कम संस्थे्या ट्रस्टीकडे सोपवली. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिनही उपस्थित होते. अभिनेता सूर्याच्या या दिलदारपणासाठी त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. 
 

Web Title: Actor Suriya To Deposit Rs 10 L For Real Life 'Jai Bhim' Victim Rajakannu's Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.