"बाबा! नाटक सुरु करतोय, आशीर्वाद द्या.."; प्रत्येक प्रयोगाआधी संकर्षण न चुकता करतो 'ही' गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक

By देवेंद्र जाधव | Updated: June 16, 2025 15:12 IST2025-06-16T15:09:38+5:302025-06-16T15:12:15+5:30

संकर्षण कऱ्हाडेचा हा कधीही न ऐकलेला खास किस्सा वाचून तुम्हीही व्हाल भावुक. इतकंच नव्हे त्याच्याविषयीचा आदर आणखी वाढेल

actor sankarshan karhade phone call to his dad before every marathi natak prayaog | "बाबा! नाटक सुरु करतोय, आशीर्वाद द्या.."; प्रत्येक प्रयोगाआधी संकर्षण न चुकता करतो 'ही' गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक

"बाबा! नाटक सुरु करतोय, आशीर्वाद द्या.."; प्रत्येक प्रयोगाआधी संकर्षण न चुकता करतो 'ही' गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणला आपण विविध सिनेमा, मालिका आणि नाटकातून अभिनय करताना पाहतोय. संकर्षणच्या कविताही त्याच्या चाहत्यांना चांगल्याच आवडतात. संकर्षण कऱ्हाडे त्याच्या कुटुंबाशी, चाहत्यांशी चांगलाच जोडलेला आहे. संकर्षणच्या वैयक्तिक आयुष्यातील असाच एक खास किस्सा त्याच्या सहकलाकाराने सांगितला आहे. त्यामुळे संकर्षणचे चाहते नक्कीच त्याच्या लाडक्या अभिनेत्याच्या आणखी प्रेमात पडतील

संकर्षणने प्रत्येक प्रयोगाआधी करतो ही गोष्ट

संकर्षणचं 'कुटुंब कीर्ररतन' हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर सुरु आहे. या नाटकानिमित्त संकर्षणचे या नाटकातील सहकलाकार अमोल कुलकर्णींनी एक खास किस्सा सांगितला आहे. अमोल यांनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "संकर्षण प्रत्येक प्रयोगाला दुसरी बेल झाली की, आजही त्याच्या वडिलांना फोन करतो. बाबा, प्रयोग सुरु करतोय, आशीर्वाद द्या, असं तो वडिलांना सांगतो. संकर्षणचं मुळांशी जोडलेलं असणं खूप छान आहे. आणि हे इथेच नाही तर, आम्ही लंडनमध्ये प्रयोग केलेत, दुबईला प्रयोग केलेत, ही त्याची सवय मोडली नाही. कधी धावपळ असेल तरीही संकर्षणचा तो फोन आजतागायत चुकलेला नाही. त्यामुळे तो लोकांशी, त्याच्या कुटुंबाशी, मित्रपरिवाराशी, जमिनीशी इतका कनेक्टेड आहे की, त्याच्या डोक्यात हवा जाणं शक्य नाही."


अशाप्रकारे अमोल कुलकर्णींनी संकर्षण कऱ्हाडेची ही खास आठवण सर्वांना सांगितली. संकर्षणचं नवीन नाटक 'कुटुंब कीर्ररतन' सध्या रंगभूमीवर गाजतंय. या नाटकात संकर्षणसोबत तन्वी मुंडले, वंदना गुप्ते हे कलाकार झळकत आहेत. याशिवाय संकर्षण अभिनेत्री स्पृहा जोशीसोबत 'संकर्षण व्हाया स्पृहा' हा कवितांचा रंगारंग कार्यक्रम करताना दिसतो. याशिवाय अभिनेत्री अमृता देशमुखसोबत संकर्षणने 'नियम व अटी लागू' या नाटकात अभिनय केला.

Web Title: actor sankarshan karhade phone call to his dad before every marathi natak prayaog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.