बेबी बम्पसह अभिनेत्रींचा जलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2016 03:44 IST2016-10-09T03:44:51+5:302016-10-09T03:44:51+5:30

आई होणे, हा कुठल्याही महिलेसाठी आनंदाचा क्षण असतो. तुमच्या-आमच्यासाठी ही खासगी बाब असेलही; पण सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र तसे म्हणता येणार नाही.

Actor Rihanna with Baby Bump | बेबी बम्पसह अभिनेत्रींचा जलवा

बेबी बम्पसह अभिनेत्रींचा जलवा

आई होणे, हा कुठल्याही महिलेसाठी आनंदाचा क्षण असतो. तुमच्या-आमच्यासाठी ही खासगी बाब असेलही; पण सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र तसे म्हणता येणार नाही. विशेषत:, बॉलिवूड अभिनेत्रींच्या बाबतीत तर नाहीच नाही. बॉलिवूड अभिनेत्रींनी कितीही आटोकाट प्रयत्न केला तरीही त्यांची ही खासगी बाब चव्हाट्यावर येणारच. काही वर्षांपूर्वी अनेक अभिनेत्री स्वत:चे बेबी बम्प दाखवण्यास धजावत असत. अनेक जणी यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळत. पण अलीकडे अभिनेत्रींची ही मानसिकता पूर्णपणे बदललेली दिसते आहे. किंबहुना, स्वत:चे बेबी बम्प अनेक अभिनेत्री अभिमानाने मिरवत आहेत. करिना कपूर हिचेच उदाहरण घ्या ना. बेबी बम्पमधील करिना आज ‘स्टाईल स्टेटमेंट’ बनली आहे. बेबी बम्प ती अभिमानाने मिरवते आहे. करिनाच्या आधीही अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना बेबी बम्प दाखविण्यात कुठलाही संकोच वाटला नाही. अशाच काही अभिनेत्रींविषयी...

अवंतिका खान
अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक हे फारसे माध्यमांसमोर आले नव्हते. बेबी बम्पसह मात्र अवंतिका हसत-हसत फोटोग्राफरना सामोरी गेली होती. या काळात तिने कॅज्युअल ड्रेसला प्राधान्य दिले.

ट्ंिवकल खन्ना
अभिनेत्री ट्ंिवकल खन्ना हीसुद्धा अगदी बिनधास्तपणे बेबी बम्पमध्ये वावरली. कॅज्युअल ड्रेसमध्ये ती अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसली. दिसलीच नाही, तर तिने तिची पे्रग्नन्सी मस्तपैकी एन्जॉयही केली.

कोंकणा सेन-शर्मा
अभिनेत्री कोंकणा सेन-शर्मा आपल्या अटींवर आयुष्य जगणारी एक बिनधास्त अभिनेत्री आहे. स्वत:च्या बेबी बम्पसह एका मासिकासाठी फोटोशूट करताना कोंकणाचा हाच बिनधास्तपणा दिसला. मातृत्व अभिमानाने मिरविण्याची बाब आहे. त्याचे अशा पद्धतीने प्रदर्शन करण्यात काहीही गैर नाही, असे कोंकणाचे मत आहे.

जेनेलिया देशमुख
अभिनेत्री जेनेलिया देशमुख काही दिवसांपूर्वी गर्भवती असताना रितेश आणि फराह खानसोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. बेबी बम्पसह तिचा फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांनी गर्दी केली. रितेश यावर नाखूष दिसला; पण जेनेलियाने मात्र अतिशय शांतपणे ही स्थिती हाताळली. जीन्स, कार्गो, अनारकली अशा फॅशन स्टेटमेंटसह बेबी बम्पसह वावरताना ती अतिशय कूल दिसली.

ऐश्वर्या राय-बच्चन : ऐश्वर्या राय-बच्चन हिने कायम स्वत:चे खासगी आयुष्य जपले आहे. खासगी आयुष्यात ती फारशी कोणाला ढवळाढवळ करू देत नाही. आराध्याच्या जन्मावेळी एका आंतरराष्ट्रीय मासिकाने तिला बेबी बम्पसह कव्हर पेजवर पोझ देण्यासंदर्भात विचारणा केली होती. यासाठी खूप मोठी आॅफरही दिली होती. मात्र, ही आपली खासगी बाब असल्याचे सांगून ऐश्वर्याने ही आॅफर धुडकावून लावली होती. अर्थात, म्हणून ऐश्वर्याने बेबी बम्प लपवण्याचा कुठलाही खटाटोप केला नाही. अनारकली ड्रेस वा साडीमध्ये बेबी बम्प दाखविण्यात तिने कुठलाही संकोच बाळगला नाही.

करिष्मा कपूर
मुलगा कियानच्या जन्माच्या वेळी करिष्माची स्थिती काहीशी अवघडल्यासारखी झाली होती; पण म्हणून करिष्माने बेबी बम्प दाखवणे टाळले नाही. ती सार्वजनिक ठिकाणी फारशी दिसली नाही; पण जेव्हा-केव्हा दिसली तेव्हा अतिशय आत्मविश्वासाने तिने आपले बेबी बम्प मिरवले. या काळात तिने सामान्य कपडे परिधान केले. तिने फॅशनला अधिक प्राधान्य दिले नाही.

लारा दत्ता
अभिनेत्री लारा दत्तानेही बेबी बम्प दाखविण्यास जराही मागेपुढे पाहिले नाही. साधारण कपड्यांपासून कॉर्पोरेट बॉडीकॉनपर्यंत सगळ्याच पोशाखात ती वावरली. या काळातही लाराने आपले सौंदर्य जपले होते.

 

-samir.inamdar@lokmat.com

Web Title: Actor Rihanna with Baby Bump