८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:30 IST2025-10-31T18:30:08+5:302025-10-31T18:30:38+5:30
धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज शुक्रवारी तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. धर्मेंद्र आता नव्वदीला आले आहेत आणि रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोमतंही कारण नाही.
धर्मेंद्र यांचं वय ८९ आहे. ८ डिसेंबर रोजी ते नव्वदी गाठणार आहेत. या वयातही त्यांची ऊर्जा, उत्साह, काम करण्याची इच्छा ही तरुणांनाही लाजवणारी असते. अनेकदा ते आपल्या दोन्ही मुलांसोबत नाचताना, गप्पा मारताना दिसतात. टीव्ही ९ भारतवर्षच्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांना वयानुसार स्वास्थ्यासंबंधी काही तक्रारी जाणवत आहेत. यामुळेच रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यांच्या काही टेस्टही होणार आहेत. तरी गंभीर काहीही घडलेलं नसून काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही.
ठरल्याप्रमाणे दरवेळी त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात येते. धर्मेंद्र यांचे चाहते आणि हितचिंतक आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी प्रार्थना करत आहेत. २०२३ साली ते करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसले होते. यात त्यांचा शबाना आजमी यांच्यासोबत किसींग सीनही होता ज्याची खूप चर्चा झाली. तर आता धर्मेंद्र हे श्रीराम राघवन यांच्या आगामी 'इक्कीस'सिनेमातही दिसणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.
