'सैयारा' नाहीतर 'या' चित्रपटातून अहान पांडे करणार होता डेब्यू! 'त्या' एका कारणामुळे स्वप्न राहिलं अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:24 IST2025-07-30T17:19:20+5:302025-07-30T17:24:53+5:30
'सैयारा' नाहीतर 'या' चित्रपटातून अहान पांडे करणार होता डेब्यू! दिग्दर्शक मोहित सुरी खुलासा करत म्हणाले...

'सैयारा' नाहीतर 'या' चित्रपटातून अहान पांडे करणार होता डेब्यू! 'त्या' एका कारणामुळे स्वप्न राहिलं अपूर्ण
Mohit Suri On Ahaan Pandey: अहान पांडे (Ahaan Pandey) आणि अनीत पड्डा स्टारर सैयारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेला हा चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘सैयारा’ हा चित्रपट एक रोमँटिक संगीतमय प्रेमकथेवर आधारित आहे. सैयाराने जगभरात ४०४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची भारतातील कमाई २६० कोटी आहे. दरम्यान, डेब्यू फिल्मने अहान पांडेला रातोरात स्टार बनवलं आहे. परंतु तु्म्हाला माहिती आहे का 'सैयारा'पूर्वी अहान पांडे यशराज फिल्मच्या दुसऱ्याच एका चित्रपटातून डेब्यू करणार होता.
दरम्यान, 'सैयारा'ला मिळालेल्या यशामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी देखील चर्चेत आले आहेत. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोहित सुरी यांनी अहान पांडेच्या डेब्यू फिल्मचा किस्सा शेअर केला आहे. त्याविषयी सांगताना ते म्हणाले, "अहान जवळपास ७ वर्षांपासून यशराज फिल्म्ससोबत काम करतो आहे. कोविडपूर्वी त्याला एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, तो प्रोजेक्ट पुढे कॅन्सल करण्यात आला. कारण, कोविडनंतर इंडस्ट्रीचं चित्र बदललं होतं. त्यामुळे अहान पांडेचं स्वप्न अपूर्णच राहिलं. त्याआधी तो सर्वांना सांगितलं होतं की यशराज फिल्म्स त्याला लॉन्च करणार आहे. पण, तसं काही घडलं नाही. त्यामुळे अनेकजण अहानला प्रश्न विचारत होते की, यशराज फिल्म्स तुला लॉन्च करणार होतं, मग आता काय झालं?"
त्यानंतर पुढे ते म्हणाले, "मला माहिती आहे कोविडनंतर आदित्य चोप्रा यांनी त्याला फोन करुन सांगितलं होतं की त्यांना त्याच्या टॅलेंटवर पूर्ण विश्वास आहे. पण, तुला जर वाटत असेल तर तू दुसऱ्या प्रोडक्शनसोबत काम करु शकतोस. तुला इथे थांबायची काहीच गरज नाही. पण, अहान त्याच्या ठाम राहिला की, यशराज फिल्म्स त्याला लॉन्च करेल आणि तसंच घडलं. त्याला त्याचं फळ मिळालं. " असा खुलासा त्यांनी केला.