‘रॉकी हँडसम’चा अॅक्शन लूक बोल्ड
By Admin | Updated: January 20, 2016 01:39 IST2016-01-20T01:39:17+5:302016-01-20T01:39:17+5:30
जॉ न अब्राहम हा हँडसम आहे यात काही शंकाच नाही. त्याची शरीरयष्टी अशी आहे,

‘रॉकी हँडसम’चा अॅक्शन लूक बोल्ड
जॉ न अब्राहम हा हँडसम आहे यात काही शंकाच नाही. त्याची शरीरयष्टी अशी आहे, ज्यासाठी कोणताही अभिनेता तळमळ करेल. आगामी त्याचा चित्रपट ‘रॉकी हँडसम’ हा त्याला व्यवस्थितपणे सूट करत आहे. तो स्वत:ला अॅक्शन हिरो म्हणवून घेतो. तो ज्यावेळेस शाळेत होता, त्यावेळी त्याला मुली हँडसम म्हणत असत. ‘मी ज्यावेळी दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्यासोबत चर्चा केली, त्यावेळी ते म्हणाले, आपण हेच नाव चित्रपटासाठी ठरवू या. माझे कॅरेक्टर हे एजंटचे आहे. ज्याला कोडिंग नाव असते. माझ्या कॅरेक्टरचे नाव कबीर असून मला रॉकी हँडसम या नावाने ओळखले जाते.’ चित्रपटाविषयी बोलले जात आहे की, यातील जॉनचा लूक हा अॅक्शन लूक कमी व सेक्सी जास्त दिसतोय. लेट्स सी. वी विल कम टू नो दॅट इज इट करेक्ट आॅर नॉट.