अ‍ॅक्सिडेंट हो गया...

By Admin | Updated: April 10, 2017 05:05 IST2017-04-10T05:05:49+5:302017-04-10T05:05:49+5:30

मालिकांचे चित्रीकरण करत असताना अपघात होणे, हे आता नवीन राहिलेले नाही.

Accident was ... | अ‍ॅक्सिडेंट हो गया...

अ‍ॅक्सिडेंट हो गया...

मालिकांचे चित्रीकरण करत असताना अपघात होणे, हे आता नवीन राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांच्या सेटवर अपघात झाले असून यात अनेक कलाकारांना दुखापतदेखील झाली आहे. जाणून घेऊया कोणत्या कोणत्या कलाकारांना झाली दुखापत...


फरनाझ शेट्टी
‘वारिस’या मालिकेच्या प्रोमोचे चित्रीकरण करण्यासाठी फरनाझला घोड्यावर बसायचे होते. पण आजूबाजूला खूप ढोल ताशे वाजत असल्याने या आवाजामुळे घोडा चवथळला आणि त्याने फरनाझच्या पायावर अनेकदा पाय दिला. खरे तर फरनाझच्या पायाला आधीपासूनच लागले होते. तिला असह्य त्रास होत होता. पण त्याही अवस्थेत तिने घोड्याला शांत केले आणि ते चित्रीकरण पूर्ण केले.


साहिल उप्पल आणि समरिध बावा

‘एक श्रृंगार... स्वाभिमान’ या मालिकेत साहिल उप्पल कुणाल तर समरिध बावा करण ही भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी एक हाणामारीचे दृश्य चित्रीत करत असताना समरिध आणि साहिल यांना चांगलीच दुखापत झाली. दृश्याच्या मागणीनुसार समरिधने टेबलवर पडणे गरजेचे होते. पण चित्रीकरण करत असताना समरिध अभिनय करण्यात पूर्णपणे तल्लीन झाला असल्याने तो टेबलवर आपटण्याऐवजी जमिनीवर आदळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच एका दृश्यात साहिलला ढकलले जाणार होते. पण चित्रीकरण्याच्यावेळी त्याला खूपच जोरात ढकलले गेले. त्यामुळे त्याचे डोके कॅमेऱ्यावर आदळले. साहिल आणि समरिध या दोघांच्याही डोक्याला चांगलेच लागले होते.


झिनल बेलाणी
‘हर मर्द का दर्द’या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झिनल जिन्यावरून घसरून पडल्याने चित्रीकरण काही काळ खोळंबले होते. तिचा पाय घसरल्याने ती जिन्यावरून पडली. सुरुवातीला तिला जबर मार बसला आहे असे कोणाला वाटलेच नाही; परंतु डॉक्टरांना बोलवल्यानंतर त्यांनी तिला तीन दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले. तिच्या गुडघ्याला खरचटले असल्याने तीन-चार दिवस तरी तिला कोणतेही शारीरिक कष्टाचे काम करण्यास मनाई करण्यात आली होती.


आदिती शर्मा
‘गंगा’ या मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना एका दिव्यामुळे आदिती शर्माच्या साडीला आग लागली होती. गंगा शंकराची पूजा करते अशा दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना हा अपघात घडला होता. या दृश्यासाठी संपूर्ण मंदिर दिव्यांनी सजवले गेले होते आणि एका दिव्याच्या खूपच जवळ आदिती उभी होती. त्याचवेळी तिच्या साडीला आग लागली. यामुळे काही वेळासाठी सेटवर एकच खळबळ माजली. क्षणात चित्रीकरण थांबवण्यात आले. पण प्रोडक्शन टीममधील लोकांनी क्षणात ती आग विझवल्यामुळे आदितीला किंवा या टीममधील कोणालाही दुखापत झाली नाही.

श्वेता बासू
‘चंद्र नंदिनी’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना श्वेता बासू पायऱ्यांवरून जोरात आपटली. सेटवर असलेल्या काही दिव्यातून झिरपणारे तेल पायऱ्यांवर सांडले होते. ते तिच्या लक्षात न आल्याने ती पायऱ्यांवरून उतरत असताना त्याचवेळी तिचा पाय घसरून ती जोरात आपटली. यामुळे तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तसेच तिचा डोळादेखील सुजला होता.

Web Title: Accident was ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.