स्क्रिप्ट न वाचताच स्वीकारला चित्रपट
By Admin | Updated: October 22, 2014 04:29 IST2014-10-22T04:28:51+5:302014-10-22T04:29:47+5:30
प्रियंका चोप्राने संजय लीला भन्साळींच्या ‘गोलियो की रासलीला-रामलीला’ या चित्रपटात एक आयटम साँग केले होते.

स्क्रिप्ट न वाचताच स्वीकारला चित्रपट
प्रियंका चोप्राने संजय लीला भन्साळींच्या ‘गोलियो की रासलीला-रामलीला’ या चित्रपटात एक आयटम साँग केले होते. भन्साळींसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळून त्याचा भविष्यात फायदा व्हावा अशी तिची इच्छा होती. त्याचा फायदा तिला ‘मेरी कॉम’च्या रूपात झाला. ‘मेरी कॉम’मधील प्रियंकाचा अभिनय पाहून भन्साळीही प्रभावित झाले आणि त्यांनी तिची प्रशंसाही केली. प्रियंकाचा भन्साळींवर एवढा विश्वास आहे की, तिने ‘बाजीराव मस्तानी’ स्क्रिप्ट न वाचता साईन केला. यात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण बाजीराव मस्तानीच्या भूमिकेत आहेत, तर प्रियंका काशीबाईच्या भूमिकेत दिसेल. भूमिकेबाबत जाणून न घेता तिने हा चित्रपट साईन केला.