‘द शौकिन्स’मध्ये अभिषेक बच्चन
By Admin | Updated: October 29, 2014 01:14 IST2014-10-29T01:14:53+5:302014-10-29T01:14:53+5:30
येत्या 7 नोव्हेंबरला रिलीज होणा:या ‘द शौकिन्स’ या चित्रपटात अभिषेक बच्चनचीही भूमिका असणार आहे. या चित्रपटात त्याने एक छोटीशी विनोदी भूमिका साकारली आहे.

‘द शौकिन्स’मध्ये अभिषेक बच्चन
येत्या 7 नोव्हेंबरला रिलीज होणा:या ‘द शौकिन्स’ या चित्रपटात अभिषेक बच्चनचीही भूमिका असणार आहे. या चित्रपटात त्याने एक छोटीशी विनोदी भूमिका साकारली आहे. ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटात अभिषेकने केलेल्या विनोदी भूमिकेबद्दल त्याची प्रशंसा केली जात आहे. अभिषेक ‘हॅप्पी न्यू ईअर’च्या प्रमोशनमध्ये बिझी असतानाच त्याला ‘द शौकिन्स’साठी संपर्क करण्यात आला होता; पण अभिषेकला ही भूमिका एवढी आवडली की, त्याने या भूमिकेसाठी वेळ काढलाच. ज्या दिवशी शूटिंग होते. त्या दिवशी तो सकाळी 6 वाजेर्पयत काम करीत होता. ‘द शौकिन्स’चे दिग्दर्शक अभिषेक शर्मा ज्युनिअर बीची प्रशंसा करताना म्हणतो, ‘मी अभिषेकच्या सेन्स ऑफ ह्युमरबाबत बरेच ऐकले होते. शूटिंगदरम्यान त्याचा अभिनय पाहून अनेकांना हसू आवरणो अवघड गेले. मी तर अभिषेकचा फॅन बनलो आहे.’