"सिनेमातल्या धुरंधरला ५० दिवसांत लोक विसरलीत...", अभिजीत बिचुकले पुन्हा बरळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:08 IST2026-01-09T18:07:55+5:302026-01-09T18:08:45+5:30
एका इव्हेंटमध्ये अभिजीत बिचुकलेंनी 'धुरंधर'बाबत वक्तव्य केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

"सिनेमातल्या धुरंधरला ५० दिवसांत लोक विसरलीत...", अभिजीत बिचुकले पुन्हा बरळले
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना होऊन गेल्यानंतरही 'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. सगळीकडे 'धुरंधर'चं कौतुक होत आहे. रणवीर सिंगच्या अभिनयालाही दाद दिली जात आहे. अशातच बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकलेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. एका इव्हेंटमध्ये अभिजीत बिचुकलेंनी 'धुरंधर'बाबत वक्तव्य केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
नुकतंच बिग बॉस मराठीचं रियुनियन झालं. स्मिता गोंदकरने बिग बॉस मराठीच्या एक्स स्पर्धकांसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अभिजीत बिचुकलेदेखील हजर होते. या इव्हेंटमधील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते 'धुरंधर'बद्दल बोलताना दिसत आहेत. अभिजीत बिचुकले म्हणतात, "आता तुम्हीच म्हणालात ना मी धुरंधरसारखा दिसतो. सिनेमातल्या धुरंधरला ५०-१०० दिवसांत लोक विसरून जातील. पण महाराष्ट्राचा खरा धुरंधर हा अभिजीत बिचुकले आहे". अभिजीत बिचुकलेंचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
दरम्यान, लवकरच बिग बॉस मराठी ६ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिजीत बिचुकलेंनी बिग बॉस मराठी २ गाजवलं होतं. त्यानंतर ते हिंदी बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. आता यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.