आमिरची तहान-भूक हरपली
By Admin | Updated: December 16, 2014 23:17 IST2014-12-16T23:17:08+5:302014-12-16T23:17:08+5:30
सध्या पीकेच्या शूटिंगमध्ये बिझी असलेला आमिर खान खूप नर्व्हस आहे. पीकेच्या रिलीजमुळे सध्या पोटात गोळा येत असल्याचे आमिरचे म्हणणे आहे.

आमिरची तहान-भूक हरपली
सध्या पीकेच्या शूटिंगमध्ये बिझी असलेला आमिर खान खूप नर्व्हस आहे. पीकेच्या रिलीजमुळे सध्या पोटात गोळा येत असल्याचे आमिरचे म्हणणे आहे. राजकुमार हिराणींचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १९ डिसेंबरला रिलीज होत आहे. आमिरने शनिवारी टिष्ट्वट केले की,‘६ दिवस बाकी आहे, आज मी जयपूरमध्ये आहे. माझी तहान भूक हरपली आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. मला माझे वजन काहीही करून कमी करायचे आहे.’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो वाराणसी, अहमदाबाद, रायपूर येथे गेला होता. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी त्याची अपेक्षा आहे.