आमीर खान थिरकला मराठी गाण्यांवर

By Admin | Updated: February 19, 2016 03:59 IST2016-02-19T02:03:29+5:302016-02-19T03:59:41+5:30

आमीर खान त्याने केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यामुळे बरेच दिवस चर्चेत होता. यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील मोठा निराश होता

Aamir Khan Thirakal on Marathi songs | आमीर खान थिरकला मराठी गाण्यांवर

आमीर खान थिरकला मराठी गाण्यांवर

आमीर खान त्याने केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यामुळे बरेच दिवस चर्चेत होता. यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील मोठा निराश होता. आपल्या याच चाहत्या वर्गाला खूश करण्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्टने रविवारी झालेल्या गिरगाव येथील ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमात अजय-अतुल या धडाकेबाज जोडीच्या मराठी गाण्यांवर पाय थिरकवून मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले, तसेच या कार्यक्रमाला राजकीय व बॉलीवूडमधील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी कविता सादर केली होती, तर हेमा मालिनी यांच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

Web Title: Aamir Khan Thirakal on Marathi songs