"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:47 IST2025-06-08T13:46:43+5:302025-06-08T13:47:35+5:30

'सितारे जमीन पर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होईल की फ्लॉप होईल, याची आमिरला भीती आहे. त्याबद्दल अभिनेत्याने मनमोकळं केलंय

Aamir Khan is worried about sitaare zameen par box office performance hit or flop | "सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-

"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (aamir khan) सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ (sitaare zameen par) बद्दल चर्चेत आहेत. आमिरचा याआधीचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे सर्वांना ‘सितारे जमीन पर’ची उत्सुकता आहे. अनेकजण आमिरचा कमबॅक सिनेमा म्हणून  ‘सितारे जमीन पर’कडे पाहत आहेत. "मी करिअरमध्ये फक्त एक फ्लॉप दिल्याने  ‘सितारे जमीन पर’ला माझा कमबॅक म्हणणं योग्य ठरणार नाही", असं आमिर म्हणाला. याशिवाय  ‘सितारे जमीन पर’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस परफॉर्मन्सविषयी आमिरला काळजी  आहे. काय म्हणाला अभिनेता?

‘सितारे जमीन पर’ फ्लॉप होण्याची आमिरली भीती?

गलाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत ‘सितारे जमीन पर’बद्दल बोलताना आमिर म्हणाला की, "मला खरंच माहीत नाही की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल की नाही. मी सतत याबद्दल तणावात असतो, कारण सध्या प्रेक्षकांना प्रामुख्याने अ‍ॅक्शन चित्रपट पाहायला आवडतात. पण तरीही मला चित्रपटावर विश्वास आहे." याशिवाय ‘लाल सिंह चड्ढा’नंतर लोकांनी आमिरवर टीका केली होती की, 'सितारे...', च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा रीमेक करत आहे. यावर आमिरने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "माझं क्रिएटिव्ह व्हिजन मी त्या कथेला देतो, त्यामुळे रिमेक असला तरीही त्यात नाविन्य असतं."

‘सितारे जमीन पर’ कधी रिलीज होणार?

अशाप्रकारे आमिर खानला ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.  ‘सितारे जमीन पर’ सिनेमा २० जूनला देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. आमिर - जिनिलीया या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

Web Title: Aamir Khan is worried about sitaare zameen par box office performance hit or flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.