एकटे पाहण्याची चूक करू नका! २०२५ चा 'हा' हॉरर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:53 IST2025-07-30T17:52:36+5:302025-07-30T17:53:07+5:30
हा चित्रपट ओटीटीवर अवघ्या काही दिवसांत नंबर १ वर पोहोचला आहे.

एकटे पाहण्याची चूक करू नका! २०२५ चा 'हा' हॉरर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडमध्ये!
तुम्हाला मिस्ट्री व थ्रिलर चित्रपट आवडत असतील, तर अलिकडेच रिलीज झालेला हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायला हवा. हा चित्रपट भारतीय नाही, हॉलिवूड आहे. या चित्रपटाची कथा खूप साधी आहे, पण त्यातील सस्पेन्स जबरदस्त आहे. नेटफ्लिक्सवर अवघ्या काही दिवसांत नंबर १ वर पोहोचलेला हा चित्रपट इतका भीतीदायक आहे की तो एकट्यानं पाहण्याची चूक कोणीही करणार नाही.
'Until Dawn' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर २४ जुलै रोजी हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित करण्यात आला आणि अवघ्या ६ दिवसांमध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नंबर १ वर पोहोचला. या चित्रपटाला IMDb रेटिंग १० पैकी ५.८ देण्यात आली आहे. रहस्य, थरार आणि भीती यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन असलेला हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेचा विषय ठरतोय.
चित्रपटाची कथा खूप चांगली आहे आणि कलाकारांचा अभिनयही उत्तम आहे. चित्रपटातील थ्रिल तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. ही फिल्म प्लेस्टेशन स्टुडिओच्या प्रसिद्ध गेमवर आधारित आहे. या चित्रपटात दाखवले आहे की, क्लोव्हर (एला रूबिन) आणि तिचे मित्र तिची गायब झालेली बहीण शोधण्यासाठी एका सुनसान खोऱ्यात जातात. मात्र तिथे त्यांना असा काही भयावह अनुभव येतो, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे बजेट सुमारे ४८० कोटी रुपये होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच जवळपास ७२० कोटींची कमाई केली आहे.