२०१६: सेलिब्रिटींचे धक्कादायक ब्रेकअप
By Admin | Updated: December 24, 2016 00:00 IST2016-12-24T00:00:00+5:302016-12-24T00:00:00+5:30
या वर्षातील सर्वात धक्कादायक बातमी होती ती हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेत्री अँजलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट यांच्या ब्रेकअपची... ...

२०१६: सेलिब्रिटींचे धक्कादायक ब्रेकअप
या वर्षातील सर्वात धक्कादायक बातमी होती ती हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेत्री अँजलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट यांच्या ब्रेकअपची... ९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २९ ऑगस्ट २०१४ साली म्हणजे अवघ्या २ वर्षांपूर्वी ते फ्रान्समध्ये विवाहबद्ध झाले होते. मि. अँड मिसेस.स्मिथ चित्रपटादरम्यान या दोघांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यादरम्यान वाद-विवाद सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र दोघांपैकी कुणीही याबाबत अधिकृतरित्या काहीच सांगितलं नवह्त. अखेर सप्टेंबर महिन्यात त्यांनी विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला.