16 वेळा वधू बनली सोनम
By Admin | Updated: December 14, 2014 00:29 IST2014-12-14T00:29:34+5:302014-12-14T00:29:34+5:30
‘डॉली की डोली’ या चित्रपटातील सोनम कपूरचा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटातील तिचा बिनधास्तपणा ट्रेलरमधून समोर आला आहेच.

16 वेळा वधू बनली सोनम
‘डॉली की डोली’ या चित्रपटातील सोनम कपूरचा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटातील तिचा बिनधास्तपणा ट्रेलरमधून समोर आला आहेच. या चित्रपटातील एका सीनमध्ये सोनम 16 वेगवेगळ्या वधूंच्या रूपात दिसणार आहे. चित्रपटात ती नवरदेवांना गंडवणा:या तरुणीच्या भूमिकेत आहे. सूत्रंनुसार चित्रपटातील एका सीनमध्ये सोनम वधूच्या अनेक रूपांत दिसणार आहे. ती ािश्चन, मराठी, दक्षिण भारतीय, गुजराती, मुस्लिम अशा 16 त:हेच्या वधूंच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. एका सीनसाठी एवढय़ांदा मेकअप करावा लागल्याने सोनम त्या सीनवेळी खूपच थकली होती; पण तरीही हे सीन तिने आनंदाने केले. सर्वात सुंदर वधू दिसण्याचे सर्वच मुलींचे स्वप्न असते. एवढय़ा गेटअपमुळे तिचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण झाले.