Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:08 PM2024-05-27T12:08:10+5:302024-05-27T12:11:46+5:30

Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीला संबोधित करताना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो फेक असल्याचे सांगितले जात आहे.

fact check of claiming pm narendra modi wrong words in rally viral video clip is altered and edited | Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य

Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य

Claim Review : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीला संबोधित करताना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: Vishvas News
Translated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून, आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ०४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यातच इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात मोठ्या प्रमाणात दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असून, यामध्ये रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अपशब्द वापरल्याचा दावा केला जात आहे. 

आमच्या तपासणीत व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप फेक आणि निवडणूक प्रचार असल्याचे आढळून आले. व्हिडिओ ए़डिटेड करण्यात आला आहे. या व्हिडिओत भाषणाच्या विशिष्ट कालावधीची क्लिप एडिट करण्यात आली आहे आणि एक लूप तयार केले गेले आहे. त्यामुळे ही व्हिडिओ क्लिप ऐकताना भ्रम होतो. मूळ भाषण २१ एप्रिल २०१९ चे आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये पाण्याच्या समस्येबद्दल आणि त्याच्या निराकरणाबद्दल बोलत असताना धरण बांधण्याबद्दल तसेच देशात नवीन जल मंत्रालयाच्या निर्मितीबद्दल बोलत होते. 

व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये काय?

सोशल मीडियावर 'जनक्रांती हापूर' नामक युजरने सदर व्हायरल व्हिडिओ क्लिप (अर्काइव्ह लिंक) शेअर केली आणि लिहिले, "मुद्दामहून स्टेजवरून अशा असभ्य भाषेचा वापर केला आहे की, हा निव्वळ योगायोग आहे?", असे कॅप्शन या युजरने दिले आहे. तसेच #boycutt_bjp #Loksabhaelections2024 #अंधभक्तमुक्तभारत असे हॅशटॅगही जोडले आहेत. 

एक्स वापरकर्ता 'आचार्य कन्फ्यूशियस' ने असाच दावा (अर्काइव्ह लिंक) व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता, जो आता डिलिट करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओचा तपास

व्हायरल व्हिडिओ क्लिप काही सेकंदांची आहे, ज्यावर 'द क्विंट'चा लोगो छापलेला आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या मुख्य फ्रेम्स शोधताना रिव्हर्स इमेजचा वापर करण्यात आला. तेव्हा 'द क्विंट' च्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला दिसला.  दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गुजरातमधील पाटण येथे झालेल्या २०१९ च्या रॅलीतील आहे. या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले होते. तो भाग फ्रेम 43.11/47.26 ते 43.40/47.26 मध्ये ऐकला जाऊ शकतो, जो व्हायरल क्लिपमध्ये समाविष्ट आहे.

यानंतर आम्ही कीवर्ड सर्चची मदत घेतली. भारतीय जनता पार्टी (BJP) च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ सापडला, त्यानुसार, तो २१ एप्रिल २०१९ रोजी गुजरातमधील पाटण येथे झालेल्या जाहीर सभेचा आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये, 48.43/53.58 ते 49.26/53.58 दरम्यानचा भाग ऐकला जाऊ येतो, जो व्हायरल क्लिपमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे भाषण गुजराती भाषेत आहे, त्यामुळे संबंधित उतारा अनुवादित करण्यासाठी आम्ही आमचे सहयोगी गुजराती जागरणच्या टीमची मदत घेतली. गुजराती जागरणने आम्हाला मोदींच्या भाषणातील या उताऱ्याचा गुजराती आणि हिंदी मजकूर प्रदान केला, जो खालीलप्रमाणे आहे:

२३ मे रोजी सायंकाळी आमचे नवीन सरकार स्थापन होईल आणि निवडणुकीचे निकाल येतील, असे मोदी या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. तसेच सरकार स्थापन होईल, वेगळे जलमंत्रालय असेल आणि देशभरातील लोक म्हणतात की, भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील. अरे भाऊ, प्रत्येकजण म्हणतोय की पाण्यावरून युद्धे होतील, मग आपण का आधीच धरणे किंवा बांध का बांधू नये? आम्ही गुजरातच्या लोकांना पाण्यापूर्वी धरण बांधायला शिकवले.

पंतप्रधानांचे हे भाषण भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर (अर्काइव्ह लिंक) देखील उपलब्ध आहे, ज्यात त्यांच्या भाषणाचा भाग फ्रेम 43.40 मधून ऐकता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पाण्याची समस्या आणि त्यावरचे उपाय यावर बोलत होते, हे स्पष्ट होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपबाबत गुजराती जागरणचे सहयोगी संपादक जीवन कपुरिया म्हणाले की, “मूळ व्हिडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाण्याची समस्या आणि त्यावर उपाय याविषयी बोलत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपशब्द वापरण्यात आलेला नाही”.

व्हायरल होणारी व्हिडिओ क्लिप संपादित केली जाते, ज्यामध्ये भाषणाच्या ठराविक कालावधीची क्लिप संपादित करून लूप तयार केली जाते. (तीच व्हिडिओ क्लिप वारंवार कॉपी आणि पेस्ट करून) जी ऐकल्यावर भ्रम निर्माण होतो.

व्हायरल व्हिडीओ क्लिप फेक क्लेमसह शेअर करणाऱ्या युजरला फेसबुकवर सुमारे एक हजार लोक फॉलो करतात. निवडणुकांशी संबंधित इतर दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट दाव्यांची चौकशी करणारे तथ्य तपासणी अहवाल निवडणूक विभागात वाचता येतील.

निष्कर्ष: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एका सभेत “अपशब्द” बोलल्याचा दावा खोटा आहे. या दाव्यासह व्हायरल होणारा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. मूळ व्हिडिओ २०१९ मध्ये पाटण, गुजरात येथे झालेल्या रॅलीचा आहे, यामध्ये मोदींनी पाण्याची समस्या आणि त्यावरील उपायांचा उल्लेख केला आणि नवीन सरकारमध्ये स्वतंत्र जल मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले.

(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

 

Web Title: fact check of claiming pm narendra modi wrong words in rally viral video clip is altered and edited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.