Chiyaan Vikram Chennai residence bomb threat details inside | सुपरस्टार विक्रमचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांनाच केला होता अज्ञात व्यक्तीने कॉल

सुपरस्टार विक्रमचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांनाच केला होता अज्ञात व्यक्तीने कॉल

साउथ सिनेमांचा सुपरस्टार चियान विक्रमला त्याचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी एका अनोळखी व्यक्तीने फोन कॉल करून अभिनेत्याच्या घरात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी श्वानांच्या मदतीने बॉम्बचा शोध घेतला. मात्र, काही सापडले नाही.

विक्रम चेन्नईच्या बेसेंट नगरमध्ये राहतो. घराच्या आजूबाजूला शोध घेतल्यावर पोलिसांनी ही घटना अफवा असल्याची सांगितलं. सोबतच अधिकाऱ्यांना फोन कॉल करणाऱ्याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. विक्रमआधी अभिनेता विजय, अजिथ, सूर्या, रजनिकांत आणि विजयकांत यांनाही अशाप्रकारे फोन करून धमक्या मिळाल्या होत्या.

सोमवारीच्या सकाळी पोलीस कंट्रोल रूममध्ये एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ज्यात त्याने विक्रमच्या घरी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. तिरूवनमियुर स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बॉम्ब डिटेक्शन अ‍ॅन्ड डिस्पोजल स्क्वॉड आणि एक स्निफर डॉगसोबत त्याच्या घराचा तपास केला. पोलिसांना एवढं समजलं की, विल्लुपुरममध्ये का व्यक्तीने फोन करून धमकी दिली होती.

याआधी विल्लुपुरम मरक्कनममध्ये एका मानसिक कमजोरी असलेल्या व्यक्तीने तामिळनाडुचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि काही अभिनेत्यांना बॉम्बची धमकी दिली होती. त्यानंतर त्या व्यक्तीच्या परिवाराने माफी मागितली होती. पोलिसांना संशय आहे की, यातही त्याच व्यक्तीचा हात असू शकतो.

विक्रमच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो अखेरचा दिग्दर्शक राजेश एम सेल्वाच्या कदरम कोंडन सिनेमात दिसला होता. सध्या त्याने अजय ज्ञानमुथु दिग्दर्शित आगामी कोबरा सिनेमाचं शूटींग सुरू केलं आहे. कोरोनामुळे या सिनेमाचं शूटींग रोखण्यात आलं होतं. कोबरा या सिनेमात माजी क्रिकेटर इरफान पठाण, श्रीनिधी शेट्टी, केएस रवि कुमार, बाबू एंथनी, रोशन मॅथ्यू आणि मिरनलिनी रवि हेही दिसतील.
 

Web Title: Chiyaan Vikram Chennai residence bomb threat details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.