भयानक... नवऱ्याचे ६ तुकडे करुन ओढ्यात फेकले; ४ दिवसांनी आढळले धड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:31 IST2023-07-30T13:47:56+5:302023-07-30T14:31:52+5:30
संबंधित घटनेची पोलिसांनी माहिती मिळताच, आरोपी दुलारीला अटक करण्यात आली असून मृतदेहाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं

भयानक... नवऱ्याचे ६ तुकडे करुन ओढ्यात फेकले; ४ दिवसांनी आढळले धड
उत्तर प्रदेश - पीलीभीतच्या गजरौला परिसरातील शिवनगर येथील रहिवाशी असलेल्या रामपाल यांचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत जवळील एका ओढ्यामध्ये आढळून आला. शिवराम यांच्या मुलाने ह्या मृतदेहाची ओळख पटवली. तत्पूर्वी शुक्रवारी दोन पोत्यात हात, डोके आणि पाय आढळून आले होते. त्यामुळे, जिल्ह्यात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे रामपाल यांची पत्नी दुलारीने २४ जुलै रोजी कुऱ्हाडीने हत्या केली. त्यानंतर, मृतदेहाचे ६ तुकडे करत ते एका पोत्यात भरुन जवळील नाल्यातही टाकून देण्यात आले होते.
संबंधित घटनेची पोलिसांनी माहिती मिळताच, आरोपी दुलारीला अटक करण्यात आली असून मृतदेहाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. तपासाअंती समोर आलेल्या माहितीवरुन पोलिसांनी जवळील शिवनगर येथील कॅनोलमधील पाण्याचा प्रवाह बंद केला. त्यामुळे, दियुरिया कोतवाली जवळील पकडिया गावांतील कॅनोलजवळ दोन पोत्यात रामपालचे हात आणि पायाचे तुकडे आढळून आले. तर, याच पोत्यात रामपालचे शीरही होते. मात्र, पोलिसांना धड आढळून आले नाही.
पोलिसांनी रामपालच्या शरीराची शोधमोहिम सुरूच ठेवली होती. शनिवारी लंमौआ गावानजीक स्थानिकांना एक पोत्यात धड आढळून आले. त्यानंतर, स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पोत्यातील मृतदेहाचे धड हे रामपालचेच असल्याची खात्री केली. मुलगा सोमपालने हे धड वडिल रामपाल यांचेच असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
याप्रकरणी, पोलिसांनी दुलारीदेवीसह तिचा प्रियकर कुंवरसेनलाही अटक केली आहे. मात्र, तो निर्दोष असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, कारण तो आजपर्यंत शिवनगर गावात केला नाही. तर, त्या गावचा रस्ताही त्याला माहिती नाही. बरेली येथील एका नरियावल फॅक्टरीत तो काम करतो. दुलोरी आणि तिची मुलगीही याच कंपनीत काम करते. कुंवरसेनने याप्रकरणात आपला किंचितही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. दुलारीनेही कुंवरसेनचा घटनेत सहभाग नसल्याचे म्हटलंय. मात्र, एकट्या महिलेने एवढे भयानक कृत्य केल्यामुळे गाव स्तब्ध झालंय.