शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गालावर मारल्या 23 चापटा, एफआयआर दाखल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 16:29 IST2023-06-25T16:29:11+5:302023-06-25T16:29:47+5:30

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर घटनेचा खुलासा झाला.

Teacher brutally beating a student; 23 slaps on the cheek, FIR filed... | शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गालावर मारल्या 23 चापटा, एफआयआर दाखल...

शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गालावर मारल्या 23 चापटा, एफआयआर दाखल...


बंगळुरुतील एका प्राथमिक शाळेतून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 23 चापटा मारल्या. या घटनेने तो विद्यार्थी खूप घाबरुन गेला आहे. ज्या मुलाला प्रेमाने समजावून सांगितले जाऊ शकत होते, त्याला 23 वेळा चापटा मारण्यात आल्या. या घटनेनंतर संबंधित शिक्षकाविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

मुलाच्या पालकांनी सांगितले की, बुधवारी चन्नासंद्रा येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलाने शिक्षकांना त्यांच्या सूचना वहीत लिहून द्यायला सांगितल्या. मुलाच्या या बोलण्याने चिडलेल्या शिक्षकाने त्याला 23 चापटा मारल्या. यापूर्वी तो मुलगा गृहपाठ करत नसल्याची तक्रार त्या शिक्षकाने मुलाच्या पालकांना लिहून पाठवली होती आणि शाळेत येऊन भेटण्यास सांगितले होते. मुलाच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी चिठ्ठी लिहून त्यांच्या सूचना लेखी पाठवण्याची मागणी केली. या प्रतिक्रियेने संतप्त झालेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली.

शिक्षकाने 23 चापटा मारल्या
मुलाच्या गाालावर 23 वेळा चापटा मारल्यामुळे त्याचा गाल सूजला आहे. मुलाच्या हनुवटीवर सूज आल्याचे आईच्या लक्षात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आईने मुलाला याबद्दल विचारले, त्यानंतर त्याने संपूर्ण घटना सांगितली. दुसऱ्या दिवशी मुलाचे पालक शाळेत पोहोचले आणि शाळेच्या अधिकाऱ्यांकडे या प्रकाराची तक्रार केली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे समजले
मुख्याध्यापकांनी शिक्षकाला समज देण्याऐवजी घरी पाठवले. त्यानंतर पालकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर पोलीस शाळेत पोहोचले. शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज मागवले. फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, 30 मिनिटांत शिक्षकाने मुलाला 23 वेळा चापटा मारल्या आहेत. पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकासह इतर काही जणांना नोटीस बजावली आहे.

Web Title: Teacher brutally beating a student; 23 slaps on the cheek, FIR filed...