फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:55 IST2025-07-10T08:55:01+5:302025-07-10T08:55:29+5:30

रिअल इस्टेट व्यावसायिक शहबाजने आपल्या परवानाधारक १२ बोअरच्या बंदुकीने स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आपले आयुष्य संपवले.

He expressed his grief on Facebook Live and ended his life in 15 minutes! Why did the real estate professional take such an extreme step? | फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 

फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 

बुधवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलेल्या एका सनसनाटी घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. गुडंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिंग रोडजवळ असलेल्या आपल्या कार्यालयात रिअल इस्टेट व्यावसायिक शहबाजने आपल्या परवानाधारक १२ बोअरच्या बंदुकीने स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली. दुपारी सुमारे ३:३० वाजता ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येच्या अवघ्या १५ मिनिटांपूर्वी शहबाजने फेसबुक लाईव्ह करत आपल्या अडचणींचा पाढा वाचला होता, ज्यात त्याने १५ कोटी रुपयांच्या कर्जात बुडाल्याचे आणि एका व्यावसायिक भागीदाराकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाजने कार्यालयात असलेल्या गार्डला कोल्ड्रिंक आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले. याच दरम्यान, त्याने गार्डची बंदूक घेतली आणि ती आपल्या कपाळाला लावून गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आणि गार्ड धावत कार्यालयाकडे आले, जिथे शहबाजचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. डोक्याचा चक्काचूर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

कर्जात बुडालेल्या व्यावसायिकाने स्वतःला संपवले!
घटनेपूर्वी शहबाजने फेसबुक लाईव्हवर आपली व्यथा मांडली होती. या लाईव्हमध्ये त्याने सांगितले की, तो १५ कोटी रुपयांच्या मोठ्या कर्जात बुडाला आहे. त्याने आपल्या एका व्यावसायिक भागीदारावर मानसिक त्रास दिल्याचा आरोपही केला. लाईव्हमध्ये शहबाज भावूक दिसत होता आणि त्याने आपले जीवन संपवण्याचा उल्लेख केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे या घटनेची चर्चा अधिकच वाढली आहे.

व्हिडीओतून मांडले दुःख
माहिती मिळताच एडीसीसीपी पूर्व, एसीपी गाझीपूर, इन्स्पेक्टर गुडंबा आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून पुरावे गोळा केले, ज्यात बंदूक, रिकामी काडतूस आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. पोलिसांनी शहबाजचे फेसबुक लाईव्ह आणि त्याच्या मोबाईल फोनची तपासणी सुरू केली आहे, जेणेकरून आत्महत्येची कारणे आणि त्याच्या भागीदाराविरुद्ध केलेल्या आरोपांची सत्यता पडताळता येईल.

पोलिसांकडून कसून तपास सुरू
एडीसीसीपी पूर्व यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. शहबाजचे फेसबुक लाईव्ह आणि त्याच्या कर्जाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. ज्या व्यावसायिक भागीदाराचे नाव शहबाजने लाईव्हमध्ये घेतले होते, त्याची चौकशी करण्याची तयारी पोलीस करत आहेत. याशिवाय, रिअल इस्टेट व्यवसायात शहबाजचे व्यवहार आणि त्याची आर्थिक स्थिती यांचीही चौकशी केली जात आहे.

Web Title: He expressed his grief on Facebook Live and ended his life in 15 minutes! Why did the real estate professional take such an extreme step?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.