WPL 2026 Royal Challengers Bengaluru Beats Mumbai Indians In Last Over : नादिन डी क्लर्क (Nadine De Klerk) च्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने WPL 2026 च्या चौथ्या हंगामात विजयी सलामी दिली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच RCB च्या संघाने सलामीच्या लढतीत MI ला पराभवाचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला १८ धावांची गरज होती. गोलंदाजीत चमक दाखवून चार विकेट्स घेणाऱ्या नादिन डी क्लर्कनं फलंदाजीत धमक दाखवत MI च्या बाजूनं झुकलेला सामना RCB च्या बाजून वळवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI कडून फक्त चौघींनी गाठला दुहेरी आकडा
महिला प्रीमियर लीगच्या सलामीच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या होत्या. आघाडीच्या फळीतील बॅटर्सं स्वस्तात माघारी फिरल्यावर सजीवन सजना ४५ (२५) आणि निकोला केरी ४० (२९) यांनी संघाचा डाव सावरला. या दोघींशिवाय जी. कमलिनी ३२ (२८) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २० (१७) यांनी दुहेरी आकडा गाठला.
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
स्मृतीसह ग्रेस हॅरीसनं चागली सुरुवात केली, पण...
मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना RCB च्या सलामी जोडीनं दमदार सुरुवात केली. स्मृती आणि ग्रेस हॅरीस जोडी जमली असे वाटत असताना शबनिम इस्माइल हिने स्मृती मानधनाच्या रुपात MI ला पहिले यश मिळवून दिले. ती १३ चेंडूत १८ धावा करून बाद झाली. तिच्या पाठोपाठ ग्रेस हॅरीस हिने १२ चेंडूत २५ धावा करून मैदान सोडलं. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या.
नादिन डी क्लर्कची फिफ्टी; RCB ला जिंकून दिला अशक्यप्राय वाटणारा सामना
नादिन डी क्लर्क आणि अरुंधती रेड्डीनं सहाव्या विकेटसाठी ५१ चेंडूत ५२ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण निकोल कॅरीनं मोक्याच्या क्षणी अरुंधतीला २० धावांवर बाद करत MI ला मॅचमध्ये आणले. अखेरच्या षटकात अशक्यप्राय वाटणाऱ्या १८ धावा करून दाखवत डी क्लर्कनं RCB च्या संघाला ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. यंदाच्या हंगामातली पहिले अर्धशतकही तिच्या बॅटमधूनच आल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात तिने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावांची खेळी केली.