डॅशिंग रोहित! 'जेट स्की'ची राईड अन् बॉलिवूड हिरोसारखी स्टाईल, Photo

जामनगरमध्ये रोहित शर्माचा एक डॅशिंग लूक पाहायला मिळाला...

मुंबई इंडियन्सचे खेळाडू सध्या सहा दिवसांच्या ब्रेकसाठी जामनगर येथे दाखल झाले आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात काही खास झालेली नाही.

रोहित शर्माला ( Rohit Sharma) कर्णधार म्हणून हटवल्यानंतर चाहत्यांचा हार्दिक पांड्यावर राग कायम आहे. घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात मुंबईला हार पत्करावी लागल्याने चाहत्यांच्या नाराजीत भर पडली आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातून सूर्यकुमार यादवचे पुनरागमन होणार आहे.

६ दिवसांच्या ब्रेकसाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू जामनगरच्या दिशेने मंगळवारी रवाना झाले होते. . कर्णधार हार्दिक पांड्यासह रोहित शर्मा व त्याची पत्नी रितिका सजदेहसह सर्व खेळाडू मुंबई विमानतळावर दिसले होते.

जामनगरमध्ये रोहित शर्माचा एक डॅशिंग लूक पाहायला मिळाला... पण, जामनगरला रवाना होताना इशान किशन सह मुंबईच्या ४ खेळाडूंना शिक्षा म्हणून सुपर मॅनचा जम्पसूट घालून प्रवास करावा लागला.