सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बांगलादेशला कसोटी पाठोपाठ टी२० मालिकेतही पराभूत केले. पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली.
आज भारत विरूद्ध बांगलादेश तिसरा आणि अखेरचा टी२० सामना रंगणार आहे. भारताने ही मालिका आधीच जिंकली असल्याने संघात ३ मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
गेल्या २ सामन्यात सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या संजू सॅमसनने अनुक्रमे २९ आणि १० अशा धावा केल्या. त्यामुळे त्याच्या जागी जितेश शर्माला संधी दिली जाऊ शकते.
वॉशिंग्टन सुंदरला वगळून रवी बिश्नोईला संघात घेतले जाऊ शकते. पहिल्या दोन सामन्यात सुंदरने एकूण ३ षटके टाकली असून त्यात एकही विकेट घेतलेली नाही.
नितीश रेड्डीप्रमाणेच हर्षित राणालाही टी२० पदार्पणाची संधी मिळू शकते. भारतीय संघाचा समतोल पाहता रियान परागला विश्रांती देऊन राणालाही समाविष्ट केले जाऊ शकते.