नादिन डी क्लर्क (Nadine De Klerk) च्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने WPL 2026 च्या चौथ्या हंगामात विजयी सलामी दिली. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच RCB च्या संघाने सलामीच्या लढतीत MI ला पराभवाचा धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला १८ धावांची गरज होती. गोलंदाजीत चमक दाखवून चार विकेट्स घेणाऱ्या नादिन डी क्लर्कनं फलंदाजीत धमक दाखवत MI च्या बाजूनं फिरलेला सामना RCB ला ३ विकेट्स राखून जिंकून दिला.
महिला प्रीमियर लीगच्या सलामीच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या होत्या. आघाडीच्या फळीतील बॅटर्सं स्वस्तात माघारी फिरल्यावर सजीवन सजना ४५ (२५) आणि निकोला केरी ४० (२९) यांनी संघाचा डाव सावरला. या दोघींशिवाय जी. कमलिनी ३२ (२८) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २० (१७) यांनी दुहेरी आकडा गाठला.
मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना RCB च्या सलामी जोडीनं दमदार सुरुवात केली. स्मृती आणि ग्रेस हॅरीस जोडी जमली असे वाटत असताना शबनिम इस्माइल हिने स्मृती मानधनाच्या रुपात MI ला पहिले यश मिळवून दिले. ती १३ चेंडूत १८ धावा करून बाद झाली. तिच्या पाठोपाठ ग्रेस हॅरीस हिने १२ चेंडूत २५ धावा करून मैदान सोडलं. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. नादिन डी क्लर्क आणि अरुंधती रेड्डीनं सहाव्या विकेटसाठी ५१ चेंडूत ५२ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण निकोल कॅरीनं मोक्याच्या क्षणी अरुंधतीला २० धावांवर बाद करत MI ला मॅचमध्ये आणले. अखेरच्या षटकात अशक्यप्राय वाटणाऱ्या धावा करून दाखवत डी क्लर्कनं सामना फिरवला. यंदाच्या हंगामातली पहिले अर्धशतकही तिच्या बॅटमधूनच आले.
Web Summary : Nadine De Klerk's all-round brilliance powered RCB to a thrilling victory over MI in the WPL 2026 opener. Her crucial batting and 4 wickets secured a 3-wicket win for RCB after a challenging chase. De Klerk's fifty sealed the win.
Web Summary : नादिन डी क्लर्क के हरफनमौला प्रदर्शन से RCB ने WPL 2026 के शुरुआती मैच में MI को रोमांचक मुकाबले में हराया। उनकी शानदार बल्लेबाजी और 4 विकेट की बदौलत RCB ने 3 विकेट से जीत हासिल की। डी क्लर्क का अर्धशतक निर्णायक रहा।