८ चौकार अन् ११ षटकारांची 'बरसात'! Abhishek Sharma नं २८ चेंडूत ठोकली 'विक्रमी सेंच्युरी'

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा भारतीय ठरला अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:34 IST2024-12-05T12:28:52+5:302024-12-05T12:34:35+5:30

whatsapp join usJoin us
Syed Mushtaq Ali Trophy Abhishek Sharma hits 28 ball century equals record for fastest T20 hundred by India batter | ८ चौकार अन् ११ षटकारांची 'बरसात'! Abhishek Sharma नं २८ चेंडूत ठोकली 'विक्रमी सेंच्युरी'

८ चौकार अन् ११ षटकारांची 'बरसात'! Abhishek Sharma नं २८ चेंडूत ठोकली 'विक्रमी सेंच्युरी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Syed Mushtaq Ali Trophy Abhishek Sharma Hits 28 Ball Century  भारतीय टी-२० संघातील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत विक्रमी शतक झळकावले आहे. देशांतर्गत टी-२० स्पर्धेत तो  पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे. गुरुवारी मेघालय विरुद्धच्या सामन्यात १४३ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. या शतकी खेळीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

८ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने  ३६५.५२ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

टीम इंडिया अन् सनरायझर्स हैदराबादचा रायजिंग स्टारनं २८ चेंडूत शतक साजरे केले. या खेळीसह खास विक्रम त्याच्या नावे जमा झाला. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद शतक करण्याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. संयुक्तरित्या या यादीत तो अव्वलस्थानी पोहचलाय. मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने २९ चेंडूत ८ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने ३६५.५२ च्या स्ट्राइक रेटनं  १०६ धावांची नाबाद खेळी केली. 

उर्विल पटेलच्या विक्रमाशी बरोबरी

यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उर्विल पटेल यानं गुजरातकडून खेळताना त्रिपूरा विरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूत शतक साजरे केले होते.  टी-२० क्रिकेटमध्ये जलद शतक करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. त्यानंतर आता अभिषक शर्मानं अशी कामगिरी करून दाखवलीये. युवीच्या चेल्यानं  टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद शतक झळकावण्याच्या उर्विल पटेलच्या विक्रमाशी बरोबरी केलीये.  

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड कुणाच्या नावे?

याआधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम रिषभ पंतच्या नावे होता. २०१८ च्या हंगामात दिल्लीच्या संघाकडून खेळताना पंतनं हिमाचल प्रदेश विरुद्ध ३२ चेंडूत शतक ठोकले होते. उर्विल पटेल आणि अभिषेक शर्मा या यादीत आता टॉपला आहेत. क्रिकेट जगतात सर्वाधिक जलद सेंच्युरीचा विक्रम हा भारतीय वंशीय एस्टोनियन क्रिकेटर साहिल चौहानच्या नावावर आहे. त्याने २७ चेंडूत शतक झळकावत वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. 

Web Title: Syed Mushtaq Ali Trophy Abhishek Sharma hits 28 ball century equals record for fastest T20 hundred by India batter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.