वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'

श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत केली होती दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:36 IST2025-06-17T15:31:10+5:302025-06-17T15:36:06+5:30

whatsapp join usJoin us
Smriti Mandhana Reclaims-Top Spot In ICC Womens ODI Rankings Ahead Of ICC Women's World Cup 2025 | वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'

वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Smriti Mandhana No 1 In ICC Women's ODI Player Rankings : नॅशनल क्रश अन् भारतीय महिला संघाची उप कर्णधार  आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीत ( ICC Women's ODI Player Rankings) पुन्हा एकदा नंबर वन ठरली आहे.  मंगळवारी आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत स्मृतीला २०१९ नंतर पहिल्यांदा नंबर वनचा मुकूट मिळाला आहे.  २८ वर्षीय डावखुरी बॅटर याआधी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती. आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत  दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ट आणि इंग्लंडची नवी कर्णधार नॅटली सायव्हर ब्रंट दोघी संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आगामी महिला वनडे वर्ल्ड कप आधी तिने ही मुंसडी मारली असल्यामुळे टीम इंडियासाठी ही गोष्ट 'अच्छे दिन'चे संकेत देणारी अशीच आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

स्मृतीनं ६ महिने अधिराज्य गाजवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची घेतली जागा

आयसीसी महिला एकदिवसीय क्रमावारीत मागील सहा महिन्यांपासून वोल्वार्ट अव्वलस्थानावर कब्जा करून बसली होती. तिच्या जागी आता भारताची स्मृती मानधना विराजमान झाली आहे. स्मृती मानधना हिने ७२७ रेटिंग पॉइंट्स सह नंबर वनचे स्थान पुन्हा पटकावले आहे. 

Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी

श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत केली होती दमदार कामगिरी

स्मृती मानधना हिने श्रीलंकेत तिरंगी मालिकेत सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश केला होता. या मालिकेत भारताशिवाय यजमान श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिकेचा समावेश होता. स्मृती मानधनाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ही मालिका जिंकली होती. या मालिकेतील अंतिम सामन्यात स्मृती मानधना हिने आपल्या वनडे कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले होते. 

जेमिमा अन् भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कितव्या स्थानी?


आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन स्मृती मानधना ही टॉप १० मध्ये असलेली एकमेव भारतीय बॅटर आहे. जेमिमा रॉड्रिग्ज ६०६ रेटिंग पॉइंट्सह १५ व्या तर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ६०५ रेटिंग पॉइंट्ससह १६ व्या क्रमांकावर आहे.  

Web Title: Smriti Mandhana Reclaims-Top Spot In ICC Womens ODI Rankings Ahead Of ICC Women's World Cup 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.