Asia Cup 2025: "यात आमची चूक नाही, त्याची..."; श्रेयस अय्यर बद्दलच्या प्रश्नावर अजित आगरकरांचे उत्तर

श्रेयस अय्यरला ड्रॉप का केलं? पुन्हा तोच रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:03 IST2025-08-19T15:52:27+5:302025-08-19T16:03:01+5:30

whatsapp join usJoin us
Shreyas Iyer Left Out Of India’s Squad For The Asia Cup Ajit Agarkar Said It’s No Fault Of His Got to tell me who he can replace Shreyas | Asia Cup 2025: "यात आमची चूक नाही, त्याची..."; श्रेयस अय्यर बद्दलच्या प्रश्नावर अजित आगरकरांचे उत्तर

Asia Cup 2025: "यात आमची चूक नाही, त्याची..."; श्रेयस अय्यर बद्दलच्या प्रश्नावर अजित आगरकरांचे उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shreyas Iyer Not India’s Asia Cup Squad : आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली.आशिया कपसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघातच सोडा पण राखीव पाचमध्येही श्रेयस अय्यरला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 अय्यरला ड्रॉप का केलं? पुन्हा तोच रिप्लाय

संघाची घोषणा केल्यावर BCCI निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनाही यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी इंग्लंड दौऱ्यावीरल कसोटी संघाच्या निवडीनंतर जे उत्तर दिले त्याच धाटणीत रिप्लाय देत एका वाक्यात श्रेयस अय्यरला ड्रॉप करण्याच्या  विषय संपवला.

India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली ...

नेमकं काय म्हणाले अजित आगरकर?


सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघात शुबमन गिलची वर्षानंतर पुन्हा टी-२० संघात एन्ट्री झाली आहे. एवढेच नाही तर त्याला उप- कर्णधारही करण्यात आले. दुसरीकडे श्रेयस अय्यर मात्र पुन्हा दुर्लक्षित राहिला. टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत असताना त्याचे नाव आशिया कप स्पर्धेसाठीच्या का नाही? असा प्रश्न आगरकरांना विचारण्यात आला होता. यावर आगरकर म्हणाले की, त्याची काहीच चूक नाही. पण सध्याच्या घडीला कुणाच्या जागी त्याला संधी द्यायची? हा मोठा प्रश्न आहे. त्याला प्रतिक्षा करावी लागेल. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटीसाठीही श्रेयस अय्यरच्या नावाचा विचार झाला नव्हता. यावेळीही आगरकरांनी याच धाटणीत उत्तर दिले होते.

 

आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उप कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा.

राखीव-  ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग.
 

Web Title: Shreyas Iyer Left Out Of India’s Squad For The Asia Cup Ajit Agarkar Said It’s No Fault Of His Got to tell me who he can replace Shreyas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.