सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावत इतिहास रचला. भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात संजू सॅमसन, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाच्या धमाकेदार कामगिरीनंतरही ICC नं फेब्रुवारीतील प्लेयर ऑफ मंथ पुरस्काराच्या नामांकित खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाला स्थान दिलेले नाही. ही गोष्ट सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन सोडणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या पुरस्काराच्या शर्यतीत एकाही भारतीयाचा समावेश नाही
ICC दर महिन्याला सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर तीन खेळाडूंची या पुरस्कारासाठी शिफारस करत असते. या तीन खेळाडूंमधून एक विजेता निश्चित केला जातो. फेब्रुवारी महिन्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामनेच खेळवण्यात आले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दबदबाही दाखवला. पण ICC नं खास पुरस्काराच्या शर्यतीत एकाही भारतीय खेळाडूला नामांकन दिलेले नाही. हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
"पहला ही उड़ा देंगे…" संजूनं शेअर केला वैभव अन् कोच द्रविड यांच्यातील खास संवादाचा किस्सा (VIDEO)
नामांकन मिळालेले खेळाडू
ICC ने ज्या तीन खेळाडूंना नामांकन दिले आहे त्यापैकी दोन संघ सेमीफायनलपर्यंतही पोहोचले नव्हते. नामांकित खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा साहिबदजादा फरहान (Sahibzada Farhan), इंग्लंडचा विल जॅक्स (Will Jacks) आणि अमेरिकेचा शॅडली वॅन शॉकविक (Shadley van Schalkwyk) यांचा समावेश आहे.फरहानने टी-२० वर्ल्ड कपमध्ये दोन शतकांसह सर्वाधिक ३८३ धावा केल्या. विल जॅक्सने १९४ धावांसह ११ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. अमेरिकेच्या शाल्विकने १३ विकेट्स घेत लक्षवेधून घेतले. पाकिस्तानचा साहिबजादा या पुरस्कारा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
महिला गटात या भारतीय गोलंदाजाला मिळालं नामांकन
ICC पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत हा पुरस्कार देते. पुरुष गटात एकाही भारतीयाला स्थान मिळाले नसले तरी महिला गटात अरुंधती रेड्डी हिला नामांकन मिळाले आहे. तिच्यासोबत या यादीत श्रीलंकेची हर्षिथा समरविक्रमा आणि पाकिस्तानची फतिमा सना यांचा समावेश आहे. अरुंधतीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ८ विकेट्स घेतल्या होत्या.
Web Summary : Despite India's T20 World Cup victory, no Indian player was nominated for ICC's Player of the Month award. Nominees include Sahibzada Farhan, Will Jacks, and Shadley van Schalkwyk. Arundhati Reddy is nominated in the women's category.
Web Summary : भारत की टी20 वर्ल्ड कप जीत के बावजूद, आईसीसी के प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार के लिए किसी भी भारतीय खिलाड़ी को नामांकित नहीं किया गया। नामांकित खिलाड़ियों में साहिबजादा फरहान, विल जैक्स और शैडली वैन शॉकविक शामिल हैं। अरुंधति रेड्डी को महिला वर्ग में नामांकित किया गया है।