Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मियाँ, बॅग पॅक कर आणि मुंबईला ये…" सिराज म्हणाला; 'प्लीज सूर्या भाई, अशी थट्टा करू नकोस!'

USA विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने कमबॅक मागची ती खास गोष्ट शेअर केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 01:24 IST

Open in App

'Miaan, Pack Your Bags And Come Siraj's Emotional Comeback In ICC T20 World Cup 2026  : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग नसलेल्या मोहम्मद सिराजची अचानक टीम इंडियात एन्ट्री झाली. कसोटीत नियमित भारतीय संघाचा सदस्य असणारा हा गोलंदाज टी-२० क्रिकेटपासून दूर होता. पण हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने बदली खेळाडूच्या रुपात ऑलराउंडरच्या जागी प्रमुख जलदगती गोलंदाजावर विश्वास ठेवला. सलामीच्या लढतीआधीच सिराज संघात जॉईन झाला. पण तुम्हाला माहिती आहे का? त्याला ज्यावेळी अचानक सूर्यकुमार यादवने टी-२० वर्ल्ड कपसाठी तू संघात आहेस, हे सांगण्यासाठी कॉल केला, त्यावेळी सिराजला त्यावर विश्वासच बसला नाही. USA विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने कमबॅक मागची ती खास गोष्ट शेअर केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सूर्याचा अचानक कॉल, सिराजला वाटलं कॅप्टन आपली थट्टा करतोय

मोहम्मद सिराज USA विरुद्धच्या सलामीच्या लढती आधी काही तास अगोदरच संघात सामील झाला. वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाल्यावरही त्याला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळेल याची कल्पना कुणी केली नव्हती. पण जसप्रीत बुमराह तापानं फणफणत असल्यामुळे सिराजला पहिल्याच सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळाली आणि तो आपल्या मियाँ मॅजिकसह या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. या कामगिरीनंतर जिओ हॉटस्टारच्या मुलाखतीत सिराजला तू वर्ल्ड कप संघाचा भाग आहेस, हे तुला कधी समजले? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सिराजनं कॅप्टन सूर्यानं कॉल केला त्यावेळी तो माझी थट्टा करतोय, असे वाटले ही गोष्ट सांगितली. 

T20 World Cup 2026 : DSP सिराजचे ‘मियाँ मॅजिक’! षटकार मारल्यावर ‘अरेस्ट वॉरंट’ काढत घेतला बदला

मोहम्मद सिराजनं सांगितला तो किस्सा, म्हणाला...

अचानक मिळालेल्या संधीबद्दल मोहम्मद सिराज म्हणाला की, "दोन दिवसांपूर्वी सूर्या भाईचा कॉल आला. 'मियाँ, बॅग पॅक कर आणि मुंबईला ये.' असे तो म्हणाला. त्यावेळी मी  ‘भाई, प्लीज अशी मजाक करू नकोस, कारण हे घडणं शक्य नाही.’ असा रिप्लाय दिला. पण तो म्हणाला, ‘मी खरंच सांगतोय, तयारीला लाग.’" त्यानंतर  भारतीय संघाचे निवडकर्ता  प्रज्ञान ओझा भाईंचा फोन आला. जे नशिबात होते ते मिळालं, अशी भावना त्याने व्यक्त केली.

दमदार कमबॅक

अगदी शेवटच्या क्षणी मिळालेल्या संधीचं मोहम्मद सिराजनं सोनं करून दाखवलं. आपल्या पहिल्या दोन षटकात त्याने दोन विकेट्स घेतल्या. अखेरच्या षटकातही शेवटच्या चेंडूवर त्याने विकेटचा डाव साधला. ४ षटकांच्या कोट्यात फक्त २९ धावा खर्च करत त्याने उत्तम गोलंदाजीचा नजराणा पेश करत आगामी सामन्यासाठीही प्लेइंग इलेव्हनमधील आपली दावेदारी पक्की केली आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Siraj's T20 World Cup Entry: Surya's Call Felt Like a Joke

Web Summary : Mohammad Siraj, initially out of the T20 World Cup, joined Team India as a replacement. Surya Yadav's call about his selection seemed like a prank to Siraj. He took 3 wickets in the first match.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६मोहम्मद सिराजसूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयसीसी