T20 World Cup 2026 : DSP सिराजचे ‘मियाँ मॅजिक’! षटकार मारल्यावर ‘अरेस्ट वॉरंट’ काढत घेतला बदला

सिराजनं षटकार खाल्ला, पण दुसऱ्याच चेंडूवर घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 22:33 IST2026-02-07T22:28:18+5:302026-02-07T22:33:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs USA Mohammed Siraj's Twin Strikes USA Struggle In Chase He Joined Team India As A Replacement For Harshit Rana In ICC T20 World Cup 2026 | T20 World Cup 2026 : DSP सिराजचे ‘मियाँ मॅजिक’! षटकार मारल्यावर ‘अरेस्ट वॉरंट’ काढत घेतला बदला

T20 World Cup 2026 : DSP सिराजचे ‘मियाँ मॅजिक’! षटकार मारल्यावर ‘अरेस्ट वॉरंट’ काढत घेतला बदला

Mohammed Siraj's Twin Strikes USA : मुंबईतील वानखेडेच्या मैदानातून भारतीय संघाने USA विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची फलंदाजी कोलमडली. संघ अडचणीत असताना कर्णधार सूर्यकुमार यादवनं संघाच्या धावफलकावर १६१ धावा लावल्या. या धावसंख्येचा बचाव करताना २४ तासाआधी भारतीय संघाला जॉईन झालेल्या DSP सिराजनं पहिल्याच स्पेलमध्ये 'मियाँ मॅजिक' दाखवलं. बॅक टू बॅक ओव्हरमध्ये त्याने विकेट्स घेत शेवटच्या क्षणी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तयार असल्याची झलकच दाखवून दिली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सिराजनं षटकार खाल्ला, पण दुसऱ्याच चेंडूवर घेतला बदला अन्...

अर्शदीप सिंगनं पहिले षटक टाकल्यावर सूर्यकुमार यादवनं  मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर एकेही धाव दिल्यावर  USA चा सलामीवीर अँड्रिज गॉस याने सिराजच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारत आपले खाते उघडले.   पण त्यानंतर सिराजनं तिसरा चेंडू निर्धाव टाकत चौथ्या चेंडूवर त्याचा बदला घेतला. तिलक वर्माकरवी त्याने गॉसला झेलबाद करत पहिल्याच षटकात विकेटचा डाव साधला. आपल्या दुसऱ्या षटकात त्याने साईतेजा मुक्कामल्ला याचाही खेळ खल्लास करत पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले.

T20 World Cup 2026 : अली खानसमोर अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'सह आली 'गंभीर' वेळ

टी-२० वर्ल्ड कप संघात 'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीनंतर सिराजनं दाखवली धमक

मोहम्मद सिराजनं कसोटीमध्ये भारतीय संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. पण व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये त्याला टीम इंडियात स्थान मिळवणे मुश्किल झाले होते. हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या बदली खेळाडूच्या  रुपात संघ व्यवस्थापनाने मोहम्मद सिराजला संधी दिली.  एवढेच नाही तर पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळाले. १९ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळताना पहिल्या दोन षटकांत  दोन विकेट्स घेत त्याने यंदाचा हंगामासाठी आपल्यावर टाकलेला भरवसा सार्थ ठरवला.  

Web Title : टी20 वर्ल्ड कप 2026: सिराज का 'मियाँ मैजिक', छक्का खाने के बाद विकेट!

Web Summary : टी20 वर्ल्ड कप में, सिराज ने चोटिल खिलाड़ी की जगह लेने के बाद 'मियाँ मैजिक' दिखाया। छक्का लगने के बावजूद, उन्होंने तुरंत एक महत्वपूर्ण विकेट लिया। भारत की खराब शुरुआत के बाद अमेरिका के खिलाफ महत्वपूर्ण मैच में उन्होंने एक और विकेट लेकर अपनी योग्यता साबित की।

Web Title : Siraj's 'Miya Magic' in T20 World Cup 2026: Wicket after Six!

Web Summary : In the T20 World Cup, Siraj showcased 'Miya Magic' after replacing an injured player. Despite conceding a six, he quickly took a crucial wicket. He then claimed another, proving his worth in the crucial USA match after a shaky start by India.