ICC T20 Rankings Indian Batsmen Dominate Ahead Of Asia Cup 2025 : युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तिसऱ्यांदा ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार असून त्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यात आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या तिघांसह राखीव खेळाडूच्या यादीत असलेल्या युवा स्टार क्रिकेटरचा आघाडीच्या १० फलंदाजांमध्ये समावेश असल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय स्फोटक बॅटर शर्माजी अन् वर्माजी पहिल्या दुसऱ्या स्थानावर
भारतीय संघातील स्फोटक युवा बॅटर अभिषेक शर्मानं आयसीसीच्या टी २० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीतील आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत तिलक वर्माचा नंबर लागतो. दोघेही ८०० पेक्षा अधिक रेटिंग पॉइंट्स मिळवत ICC च्या फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. अभिषेक शर्माच्या खात्यात ८२९ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. याशिवाय तिलक वर्मा ८०४ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.
ICC ODI Rankings : पहिल्यांदाच झिम्बाब्वेच्या सिकंदरची 'बादशाहत'; फलंदाजीत गिल-रोहितचा जलवा
कॅप्टन सूर्यकुमार यादवसह राखीव खेळाडूंच्या यादीत असलेला यशस्वी टॉप १० मध्ये दिसतो
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ICC च्या फलंदाजांच्या नव्या टी-२० क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल दहाव्या क्रमांकावर आहे. जो आशिया कप स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंच्या यादीत आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट (७९१ रेटिंग) आणि जोस बटलर (७७२) यांच्यासह ट्रॅविस हेड (७७१) सूर्यकुमार यादवच्या पुढे आणि आघाडीच्या पाचमध्ये आहे. आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव या मंडळींना मागे टाकणार का? ते पाहण्याजोगे असेल.
गोलंदाजीत तिघांचा तर अष्टपैलूंच्या गटात पांड्याची हवा
आयसीसीच्या गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत न्यूझीलंडचा जेकॉब अव्वलस्थानी आहे. त्याच्या खात्यात ७१७ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. भारताचा फिरकीपटू वर्ण चक्रवर्ती ७०६ रेटिंगसह चौथ्या, रवी बिश्नोई ६७४ रेटिंगसह सातव्या तर अर्शदीप सिंग ६५३ रेटिंगसह दहव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलूंच्या यादीत एकमेव पांड्या टॉप १० मध्ये असला तरी तो अव्वलस्थानावर आहे.
टीम इंडियासह टॉप १० मध्ये कोण?
भारतीय संघाचा विचार केला तर २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून भारतीय संघ सातत्याने या फॉरमॅटमध्ये दिमाखदार कामगिरी करताना दिसला आहे. परिणामी आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील संघांच्या यादीत भारतीय संघ २७१ रेटिंग पॉइंट्ससह सर्वात टॉपला आहे. टीम इंडियापाठोपाठ ऑस्ट्रेलियन संघ २६६ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येते. इंग्लंड (२५७ रेटिंग पॉइंट्स) , न्यूझीलंड (२५३ रेटिंग पॉइंट्स) आणि दक्षिण आफ्रिका (२४३ रेटिंग पॉइंट्स) सह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
Web Title: Latest ICC T20 Rankings Indian Batsmen Dominate Ahead Of Asia Cup 2025 Abhishek Sharma Tilak Varma Suryakumar Yadav
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.