IPL 2026: भुवनेश्वरनं बिघडवला मुंबईचा खेळ! थेट स्पर्धेतूनच बाहेर काढलं, नेमकं कुठं पालटला गेम? 

RCB vs MI: इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल रंगलेला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:43 IST2026-05-11T10:42:28+5:302026-05-11T10:43:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: RCB Knocks Mumbai Indians Out of Tournament as Bhuvneshwar Kumar Last-Over Heroics Seal Dramatic Win | IPL 2026: भुवनेश्वरनं बिघडवला मुंबईचा खेळ! थेट स्पर्धेतूनच बाहेर काढलं, नेमकं कुठं पालटला गेम? 

IPL 2026: भुवनेश्वरनं बिघडवला मुंबईचा खेळ! थेट स्पर्धेतूनच बाहेर काढलं, नेमकं कुठं पालटला गेम? 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल रंगलेला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत आरसीबीने दोन विकेट्स राखून विजय मिळवला आणि मुंबईला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. एका क्षणी सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकलेला दिसत असतानाच भुवनेश्वर कुमारच्या अनपेक्षित षटकाराने सामन्याचे चित्र पालटले आणि आरसीबीने रोमांचक विजय खेचून आणला.

नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या डावात तिलक वर्माने ५१ धावांची संयमी खेळी केली, तर नमन धीरने ४७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दोघांच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकांत १६६ धावांचा टप्पा गाठला. आरसीबीकडून अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत चार विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पॉवर प्लेमध्येच विराट कोहली, देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार रजत पाटीदार यांची विकेट्स पडल्याने संघ अडचणीत सापडला. त्यानंतर क्रुणाल पांड्याने एकहाती झुंज देत संघाला सावरले. त्याने संयमी आणि जबाबदारीपूर्ण फलंदाजी करत ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे आरसीबीच्या विजयाच्या आशा कायम राहिल्या. 

शेवटच्या षटकात नेमके काय घडले?

अखेरच्या षटकात आरसीबीला विजयासाठी १५ धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूंमध्ये केवळ पाच धावा झाल्याने सामना मुंबईच्या बाजूने झुकला. त्यावेळी क्रीजवर भुवनेश्वर कुमार आणि रासिक सलाम दार होते. त्यामुळे मुंबईचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, चौथ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने अप्रतिम षटकार ठोकत सामन्याला कलाटणी दिली. या एका फटक्यामुळे समीकरण अचानक आरसीबीच्या बाजूने फिरले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली गेली आणि शेवटच्या चेंडूवर आवश्यक दोन धावा पूर्ण करत आरसीबीने दोन विकेट्सने अविस्मरणीय विजय नोंदवला.

भुवनेश्वरचा षटकार ठरला निर्णायक टर्निंग पॉईंट

सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट म्हणजे भुवनेश्वर कुमारने मारलेला चौथ्या चेंडूवरील षटकार. त्या फटक्यापूर्वी मुंबई इंडियन्स विजयाच्या उंबरठ्यावर होती. मात्र, एका षटकाराने संपूर्ण दडपण मुंबईवर गेले आणि आरसीबीने संधीचा फायदा घेत अखेरच्या चेंडूवर विजय साकारला.

Web Title : भुवनेश्वर के छक्के ने मुंबई को IPL 2026 से बाहर किया!

Web Summary : भुवनेश्वर कुमार के महत्वपूर्ण छक्के की बदौलत RCB ने रोमांचक मुकाबले में मुंबई को हराया। मुंबई ने 166 रन बनाए, जिसमें तिलक वर्मा और नमन धीर का योगदान था। RCB की शुरुआत खराब रही, लेकिन क्रुणाल पांड्या के 73 और भुवनेश्वर के आखिरी ओवरों के प्रदर्शन ने मुंबई की उम्मीदों को खत्म कर दिया।

Web Title : Bhuvneshwar's six knocks Mumbai out of IPL 2026!

Web Summary : RCB defeated Mumbai in a thrilling last-ball finish, thanks to Bhuvneshwar Kumar's crucial six. Mumbai posted 166, with Tilak Varma and Naman Dhir contributing. RCB struggled initially, but Krunal Pandya's 73 and Bhuvneshwar's late heroics sealed the win, ending Mumbai's IPL hopes.