आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी अबू धाबी येथे खेळाडूंच्या मिनी लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. सलग तिसऱ्यांदा परदेशात पार पडणाऱ्या लिलावात यावेळी शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ सर्वाधिक पैसा बाळगून आहे. याशिवाय काव्या मारनच्या मालकीचा हैदराबाद, संजीव गोएंका यांचा लखनौ आणि दिल्ली फ्रँचायझी संघाच्या पर्समध्येही २० कोटींहून अधिक पैसा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पर्समध्ये बक्कल पैसा असून अनेक फ्रँचायझींना टेन्शन
मिनी लिलावात उतरण्यासाठी पर्समध्ये मोठी रक्कम असतानाही अनेक फ्रँचायझींच्या ताप्यात संघ बांधणीचं टेन्शन दिसून येते. लिलावात सर्वोत्तम डाव खेळत योग्य बोलीसह सर्वोत्तम खेळाडू आपल्या ताफ्यात कसा घेता येईल, यासाठी ते रणनिती आखत आहेत. दुसरीकडे पर्समध्ये सर्वात कमी रक्कम असूनही मुंबई इंडियन्स फ्रँचायझी मात्र एकदम निवांत आहे. इथं एक नजर टाकुयात MI च्या पर्समध्ये कमी पैसा असूनही ते टेन्शन फ्री कसे? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
MI च्या पर्समध्ये किती पैसा?
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघ २ कोटी ७५ लाख रुपयांसह मिनी लिलावात उतरणार आहे. ५ खेळाडूंमध्ये त्यांना एक परदेशी खेळाडू संघात घेता येईल. मिनी लिलावाआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेड विंडोच्या माध्यमातून शार्दुल ठाकुर, मयंक मार्कंडेय आणि शेरफेन रदरफोर्ड यांना आपल्या संघात घेण्यासाठी अधिक पैसा खर्च केला. MI संघाने खेळलेला हा डाव सर्व फ्रँचायझी संघापेक्षा भारी ठरला.
पर्समध्ये सर्वात कमी रक्कम असली तरी,...
मुंबई इंडियन्सच्या संघाने मिनी लिलावाआधी जुन्या खेळाडूंवर भरवसा दाखवत २० सदस्यीय संघाची बांधणी केली आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर या भारतीय स्टार्समळे संघ मजबूत दिसतो. परदेशी खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, विल जॅक्स, रियान रिकल्टन, कॉर्बिन बॉश, शेरफेन रदरफोर्ड आणि अल्लाह गजनफर यांचा समावेश आहे. आता उर्वरित ५ जागेसाठी त्यांना फक्त बॅकअप खेळाडूंना शोधायचे आहे. त्यामुळे कमी बजेट असतानाही त्यांना संघबांधणीची चिंताच उरलेली नाही.