लेडी सेहवाग शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या कडक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात विक्रमी १९२ धावसंख्या उभारली. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डच्या शतकी खेळीच्या जोरावर हे आव्हान अगदी सहज पार करत सलग तिसऱ्या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन वर्षांनी टीम इंडियावर आली ही वेळ
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील भारतीय संघाने आधीच दोन सामने गमावले होते. जोहन्सबर्गच्या द वंडर्सच्या मैदानात मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाने तगडे आव्हान सेट केले. पण लॉरानं टीम इंडियाच्या विक्रमी कामगिरीवर पाणी फेरलं. यासह भारतीय संघाचा दोन वर्षांचा विजयी सिलसिला संपुष्टात आला. भारतीय संघाने जानेवारी २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी गमावली होती. त्यानंतर द्विपक्षीय टी-२० मालिकेत भारतीय संघाने दबदबा दाखवून दिला. पण दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजय रथ रोखला आहे.
ओल्ड इज गोल्ड! IPL मधील धमाकेदार कामगिरीसह ‘या’ ५ धुरंधरांनी ठोठावला Team India चा दरवाजा
टीम इंडियाने विक्रमी धावसंख्या उभारली, पण...
स्मृती मानधना २५ चेंडूत ३७ धावांवर माघारी फिरल्यावर तिच्या जागी आलेल्या जेमिमा रॉड्रिंग्सवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर जोडीनं संघाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ७३ धावांची भागीदारी रचली. शेफालीनं ४६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ३८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. या दोघीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. टी-२० मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सर्वोच्च धावसक्या ठरली. पण मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ही धावसंख्याही अपूरी ठरली.
लॉराचा तोरा; दक्षिण आफ्रिकेनं ९९ चेंडूत संपवली मॅच
भारतीय संघाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना लॉरानं ५३ चेंडूत १४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २१६ च्या स्ट्राईक रेटसह ११५ धावा केल्या. याशिवाय सुने लुइस हिने ४२ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी साकारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९९ चेंडूत ही मॅच संपवली.