Join us

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन

India’s squad for Tour of Australia announced Shubmam Gill named Captain for ODIs : गिलच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा विराट कोहली करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:51 IST

Open in App

India’s squad for Tour of Australia announced Shubmam Gill named  Captain for ODIs: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झालीये. पण कसोटीनंतर आता वनडेतही नव्या पर्वाची सुरुवात झालीये. कसोटी पाठोपाठ आता वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही आता शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर  श्रेयस अय्यरला  उप कर्णधार करण्यात आले आहे. टी-२० संघाचे नेतृत्व हे सूर्यकुमार यादवकडे कायम आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघशुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप -कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिगं, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उप कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश कुमार (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्,क), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर

English
हिंदी सारांश
Web Title : India squad for Australia tour announced; Gill to captain ODIs.

Web Summary : India's squad for the Australia tour is announced. Shubman Gill will captain the ODI team, while Suryakumar Yadav continues to lead the T20 team. Rohit Sharma and Virat Kohli are in the squad for the international matches.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलरोहित शर्माविराट कोहलीश्रेयस अय्यर