Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 Word Cup 2026 : सुपर ८ मध्ये भारत-झिम्बाब्वे यांच्यातील लढतही फिक्स! कधी अन् कुठं रंगणार हा सामना?

झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीसह सुपर ८ फेरीत भारतीय संघाविरुद्ध कोणता संघ कधी भिडणार ते चित्रही झाले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:15 IST

Open in App

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेतील कँडीच्या पल्लेकेलेच्या मैदानातील झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामन्यावर पावसाने पाणी फेरले. हा सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाल्यावर 'ब' गटातून श्रीलंकेपाठोपाठ झिम्बाब्वेच्या संघाने सुपर ८ चं तिकीट पक्के केले. झिम्बाब्बे सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरणारा सातवा संघ ठरला. या निकालासह भारतीय संघाचे सुपर ८ मधील लढतींचे चित्रही स्पष्ट झाले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारत-झिम्ब्बावे यांच्यातील सामनाही झाला फिक्स

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीनं सुपर ८ फेरीतील लढतींची सुरुवात करणार आणि वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा सामना खेळणार हे आधीच स्पष्ट झाले होता. या फेरीतल दुसऱ्या सामन्यात भारत-झिम्बाब्वे यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे.  

NZ vs CAN : युवराजचं विक्रमी शतक व्यर्थ! फिलिप्स-रचिनची फिफ्टी; न्यूझीलंडही Super 8 साठी नटली

कधी आणि कुठं रंगणार सामना?

सुपर ८ फेरीत रविवारी, २२ फेब्रुवारीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवारी, २६ फेब्रुवारीला भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील सामना पाहायला मिळेल. हा सामना चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात खेळवण्यात येईल. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सुपर ८ मधील आपला अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना रविवारी, १ मार्चला नियोजित आहे. हे सर्व सामने भारतीय  प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होतील.

भारतीय संघ यंदाच्या हंगामताील जेतेपदाचा प्रबळ दावेदार

गत चॅम्पियन भारतीय संघ यंदाच्या हंगामातील प्रबळ दावेदार मानला जात आहे. २०२४ च्या हंगामात सर्वच्या सर्व सामने जिंकत ट्रॉफी उंचावल्यानंतर यंदाच्या हंगामातही भारतीय संघाचा विजयी सिलसिला कायम आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग ११ विजय नोंदवण्याचा खास विश्व विक्रम भारतीय संघाने आपल्या नावे केला आहे. हीच मालिका कायम राखत सुपर ८ फेरीतील लढतीमध्येही टीम इंडिया आपला रुबाब कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

 भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील वेळापत्रक

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup: India vs. Zimbabwe Super 8 Clash Fixed!

Web Summary : Zimbabwe's Super 8 qualification sets up India clash. India starts against South Africa on February 22nd in Ahmedabad, faces Zimbabwe February 26th in Chennai, and ends against West Indies on March 1st in Kolkata. India aims for continued victory.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत-झिम्बाब्वेभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत विरुद्ध वेस्ट इंडिजटी-20 क्रिकेटआयसीसीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ