BCCI Announced Indian Women Team T20I Series Schedule : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यापासून भारतीय महिला संघाने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बांगलादेशविरुद्धची घरच्या मैदानातील मालिका स्थगित करण्यात आल्यावर संघ कधी मैदानात उतरणार? अशी चर्चा रंगली होती. BCCI नं भारतीय महिला संघाच्या आगामी कार्यक्रमाचे वेळापत्र जाहीर करत चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे. विश्वविजेता भारतीय महिला संघ घरच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरून भारतीय संघाच्या द्विपक्षीय दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडे वर्ल्ड कप जिंकला, आता टी-२० मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याची तयारी
भारत आणि श्रीलंका यांच्यात २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण असेल. वनडेनंतर भारतीय महिला संघ टी-२० क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल.
कधी अन् कुठं रंगणार महिला टी-२० मालिकेचा थरार!
भारत-श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ डिसेंबरला विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २३ डिसेंबरला दोन्ही संघ याच मैदानात मालिकेतील दुसरा सामना खेळतील. त्यानंतर २६, २८ आणि ३० डिसेंबरला भारत-श्रीलंका यांच्यातील टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाला स्मृती मानधनाशिवाय मैदानात उतरावे लागणार?
या मालिकेत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. या मालिकेत स्मृती मानधना टीम इंडियाचा भाग असणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल. वनड वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर स्मृती मानधना लग्नामुळे चर्चेत आली होती. पण आता ती लग्नात आलेल्या विघ्नामुळे चर्चेत आहे. तिच्यासंदर्भात ज्या गोष्टी घडत आहेत ते पाहता आगामी मालिकेपासून ती दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
श्रीलंकेविरुद्ध एकदम दमदार आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २० टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यात भारतीय संघाने २० सामने जिंकले असून श्रीलंकेच्या संघाने फक्त ५ सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. आगामी मालिकेत हा रेकॉर्ड आणखी भक्कम करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.