IND vs SA, 2nd ODI Live Updates : शून्यावर बाद झालेला Virat Kohli डान्स करताना दिसला, जाणून घ्या नेमका काय किस्सा घडला, Video  

India vs South Africa, 2nd ODI Live Updates : लोकेश राहुल व रिषभ पंत यांनी टीम इंडियाला दुसऱ्या वन डे सामन्यात कमबॅक करून दिले. दोघांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:19 PM2022-01-21T17:19:22+5:302022-01-21T17:21:02+5:30

IND vs SA, 2nd ODI Live Updates : Virat Kohli dancing after that Rishabh Pant 4, Watch Video  | IND vs SA, 2nd ODI Live Updates : शून्यावर बाद झालेला Virat Kohli डान्स करताना दिसला, जाणून घ्या नेमका काय किस्सा घडला, Video  

IND vs SA, 2nd ODI Live Updates : शून्यावर बाद झालेला Virat Kohli डान्स करताना दिसला, जाणून घ्या नेमका काय किस्सा घडला, Video  

Next

India vs South Africa, 2nd ODI Live Updates : लोकेश राहुलरिषभ पंत यांनी टीम इंडियाला दुसऱ्या वन डे सामन्यात कमबॅक करून दिले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करताना संघाचा धावफलक साडेपाचच्या सरासरीनं हलता ठेवला. पण, ही दोघं माघारी परतली अन् धावांचा वेग मंदावला. या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. पण, शिखर धवनसोबत पेव्हेलियनमध्ये बसलेल्या विराटचा डान्स कॅमेरामननं कैद केला. 

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली पुढच्याच षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर भोपळ्यावर बाद झाला. रिषभ पंत व लोकेश यांनी भारताचा डाव सावरला. रिषभनं ४३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. लोकेशनं ७१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ३२व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. सिसांडा मगालाच्या गोलंदाजीवर लोकेश ५५ धावांवर झेलबाद झाला आणि रिषभसह त्याची ११५ धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर पुढच्याच षटकात तब्रेझ शम्सीच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात रिषभ झेलबाद झाला. यावेळी मार्करामनं कोणतीच चूक  केली नाही. रिषभनं ७१ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ८५ धावा केल्या.

रिषभची फटकेबाजी पाहून माजी कर्णधार विराट भलताच खूश झालेला दिसला आणि रिषभच्या एका चौकारावर तो चक्क डान्स करताना दिसला. 

पाहा व्हिडीओ... 

Web Title: IND vs SA, 2nd ODI Live Updates : Virat Kohli dancing after that Rishabh Pant 4, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app