न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ बदलासह उतरला आहे. या सामन्यात टीम इंडियातून संजूचा पत्ता कट होणार, अशी चर्चा रंगली होती. पण सूर्यानं नाणेफेकीनंतर संजूवरील भरवसा कायम असल्याचे सांगत तो या सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले. भारतीय कर्णधारानं अगदी खास अंदाजात घरच्या मैदानात संजू प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याचे सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काळजी करू नका; संजू आजही खेळतोय
नाणेफेकीनंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. काल रात्री आम्ही इथे होतो, मैदानावर भरपूर दव होतं. ग्राउंड्समनने ही परिस्थिती ४० षटके कायम राहिल, असे सांगितले आहे. या परिस्थितीचा सामना करण्याची कसोटी आमच्यासमोर आहे. त्याचीच चाचपणी करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अक्षर संघात परतला आहे. इशान किशनही या सामन्यात खेळणार आहे. याशिवाय आणखी एक बदल आहे. पण काळजी करू नका तिरुवनंतपुरमकरांनो, आज संजू सॅमसन खेळतोय, अशा शब्दांत त्याने संघ व्यवस्थापन संजूला घरच्या मैदानावर बाकवर बसवणार नाही हे स्पष्ट केले.
T20 World Cup 2026 : टीम इंडियासह 'या' संघात ३०० धावा करण्याची ताकद; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी
भारताती प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन :
टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन एलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, बेवॉनन जेकब्स, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमीसन, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी.