T20 World Cup 2026 : टीम इंडियासह 'या' संघात ३०० धावा करण्याची ताकद; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

संजनाचा सवाल अन् शास्त्रींचा रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:13 IST2026-01-30T16:10:49+5:302026-01-30T16:13:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup 2026: 'This' team has the power to score 300 runs along with Team India; Ravi Shastri's big prediction | T20 World Cup 2026 : टीम इंडियासह 'या' संघात ३०० धावा करण्याची ताकद; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

T20 World Cup 2026 : टीम इंडियासह 'या' संघात ३०० धावा करण्याची ताकद; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ इतिहास रचेल,अशी अपेक्षा आहे. आतापर्यंतच्या टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाही संघाने सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेली नाही. एवढेच नाही तर घरच्या मैदानात कुणालाही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद मिरवता आलेले नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टीम इंडियासंदर्भात शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

टीम इंडिया छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्याने मोठा धमाका करत असून यंदाच्या हंगामात सूर्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यंदाच्या हंगामात टीम इंडिया  ३०० धावांसह नवा विक्रमही प्रस्थापित करेल, असे भाकित भारताचे माजी प्रशिक्षक आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी केले आहे. टीम इंडियासोबत त्यांनी आणखी एका संघामध्ये हा पल्ला गाठण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर 

उधारीची बॅट अन् शतकी रुबाब! क्विंटन डी कॉकनं केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये फक्त तीन संघांनी गाठलाय ३०० धावसंख्येचा आकडा
 
क्रिकेटच्या छोट्या प्रारुपात धावांची 'बरसात' होताना पाहायला मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का? या प्रारुपात आतापर्यंतच्या इतिहासात फक्त तीन संघच असे आहेत ज्यांनी आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३०० धावांचा आकडा पार केला आहे. त्यातही ICC चा नियमित सदस्य असणाऱ्या फक्त इंग्लंडचा संघ या यादीत आहे. इतर दोन संघांमध्ये झिम्बाब्वे आणि नेपाळ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४४ धावांचा विक्रम हा झिम्बाब्वेच्या नावे आहे.

संजनाचा सवाल अन् शास्त्रींचा रिप्लाय

ICC च्या रिव्ह्यू कार्यक्रमात जसप्रीत बुमराहची पत्नी आणि लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिने रवी शास्त्रींना यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणता संघ ३०० धावसंख्या उभारु शकतो? असा प्रश्न विचारला होता. यावर शास्त्रींनी याआधी असा पराक्रम करणाऱ्या इंग्लंडला वगळून दोन संघांची नावे सांगितली.  ते म्हणाले की, "माझ्या मते ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन संघ ३०० धावांचा आकडा पार करू शकतात. या दोन्ही संघांकडे ज्या प्रकारचे खेळाडू आहेत, ते पाहता हे दोन संघ या बाबतीत आघाडीवर असतील, असे वाटते. जर टॉप ऑर्डरमधील एखाद्या खेळाडूने शतक झळकावले, तर ३०० धावसंख्येचा पल्ला अगदी सहज गाठता येईल" असेही त्यांनी म्हटले आहे. 

Web Title : टी20 विश्व कप 2026: भारत, ऑस्ट्रेलिया 300 रन बना सकते हैं: शास्त्री।

Web Summary : रवि शास्त्री ने भविष्यवाणी की है कि भारत या ऑस्ट्रेलिया टी20 विश्व कप 2026 में 300 रन तक पहुंच सकते हैं। उन्होंने उनकी मजबूत बल्लेबाजी लाइनअप पर प्रकाश डाला, यह सुझाव दिया कि शीर्ष क्रम के बल्लेबाज से शतक लक्ष्य को प्राप्त करने योग्य बना सकता है। टी20 अंतरराष्ट्रीय में केवल तीन टीमों ने 300 का आंकड़ा पार किया है।

Web Title : T20 World Cup 2026: India, Australia can score 300: Shastri.

Web Summary : Ravi Shastri predicts India or Australia could reach 300 in the T20 World Cup 2026. He highlighted their strong batting lineups, suggesting a century from a top-order batsman could make the target achievable. Only three teams have crossed 300 in T20Is.