IND vs ENG Semi Final T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-२० विश्वच,क २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड संघ एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम खेळवण्यात येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा हे दोन संघ उपांत्य फेरीत एकमेकांना भिडण्याचा कमालीचा योगायोग जूळून आल्यावर या दोन्ही संघातील एक संघ यंदा जेतेपद उंचावेल, अशी चर्चा रंगू लागली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-इंग्लंड यांच्यातील लढत अन् कमालीचा योगोयोग
भारत-इंग्लंड हे दोन संघ याआधी २०२२ आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. २०२२ मध्ये इंग्लंडने बाजी मारली, तर २०२४ मध्ये भारताने विजेतेपद उंचावत हिशोब चुकता केला. आता पुन्हा एकदा उपांत्य फेरीत हेच दोन संघ पुन्हा भिडणार असल्याने, या लढतीतील विजेताच यंदा ट्रॉफी जिंकेल का? सलग तिसऱ्यांदा कमालीचा योगायोग पाहायला मिळणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Sanju Samson: संजू सॅमसनकडून झाली मोठी चूक; आयसीसी करू शकते निलंबनाची कारवाई, असं घडलं तरी काय?
मागील दोन विश्वचषक स्पर्धेत काय घडलं?
२०२२ च्या हंगामात दुसऱ्या उपांत्य फेरीतच भारत-इंग्लंड यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या हंगामात इंग्लंडच्या संघाने बाजी मारली अन् अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गत हंगामात या पराभवाची परतफेड केली. कमालीचा योग म्हणजे गत हंगामातही दुसऱ्या उपांत्य फेरीतील लढतीतच दोन्ही संघ समोरासमोर आले होते. यावेळी भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली अन् दक्षिण आफ्रिकेला पराभूत कर ट्रॉफी जिंकली होती.
टीम इंडियाची आकडेवारी भारी, पण इंग्लंडही ठरते लक्षवेधी; कारण,,,
भारतीय संघाचा मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील कामगिरी दमदार राहिली आहे. इथं टीम इंडियाने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. डिसेंबर २०१७ नंतर या मैदानात भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही. दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या संघाने या मैदानात ६ पैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत. आकडेवारीच्या बाबतीत भारतीय संघ पुढे असला तरी एक गोष्ट इंग्लंडच्या बाजूनंही आहे. भारतीय संघाला या सामन्यात फक्त दोन संघाकडूनच पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यात इंग्लंडच्या संघाचा समावेश आहे. २०१२ मध्ये इंग्लंड तर २०१६ मध्ये टीम इंडियाला या मैदानात वेस्ट इंडिजच्या संघाकडून टी-२० मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
IND vs ENG यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील रेकॉर्ड
- एकूण सामने – ५
- भारत – ३ विजय
- इंग्लंड – २ विजय
- उपांत्या फेरीत बरोबरीची लढाई
- सामने – २
- भारत – १
- इंग्लंड – १