Join us  

ICC Women's T20 World Cup : उपांत्य फेरीच्या लढती पावसामुळे रद्द झाल्यास, फायनलचं तिकीट कोणाला? 

ICC Women's T20 World Cup: महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 5:29 PM

Open in App

ICC Women's T20 World Cup: महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला ब गटातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आफ्रिकेनं ब गटात अव्वल स्थान पटकावले आणि आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. भारतीय महिलांसमोर इंग्लंडचे आव्हान असेल. पण, या दोन्ही सामन्यांवर पावसाचं सावट आहे आणि तसे झाल्यास अंतिम फेरीत कोणता संघ प्रवेश करेल?

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2017मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. हिदर नाइटच्या संघानं बाजी मारताना जेतेपद उंचावले होते. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी टीम इंडियाला मिळाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियानं सोमवारी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. त्यांच्यासमोर आफ्रिकेचे आव्हान असेल. आफ्रिकेनं 2014मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलियानं चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे, तर इंग्लंडनं 2009चा पहिलाच वर्ल्ड कप उंचावला होता.   

वेळापत्रकभारत विरुद्ध इंग्लंड, 5 मार्च, सकाळी 9.30 वाजल्यापासूनदक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 5 मार्च, दुपारी 1.30 वाजल्यापासून 

या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्चला जागतिक महिला दिनी होणार आहे. पण, उपांत्य फेरीचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाल्यास अंतिम फेरीचे तिकीट कोणाला मिळेल?पुढील काही दिवसांत सिडनीत पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे उपांत्य पेरीच्या सामन्यांनवर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे जर उपांत्य फेरीचे सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत प्रवेश करतील.  कारण, भारतानं अ गटात 8 गुणांसह, तर आफ्रिकेनं ब गटात 7 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

किमान 10 षटकं तरी झाली पाहिजेत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका संघानं किमात पाच षटकं खेळली तर तो सामना ग्राह्य धरला जातो. पण, या स्पर्धेत आयसीसीनं नियमात बदल केली असून एका संघाला किमान 10 षटकं खेळावी लागतील. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल. पावसामुळे 10 षटकंही न झाल्यास भारत आणि आफ्रिका अंतिम फेरीत जातील. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे जेतेपदाचे दावेदार असलेले संघ पाऊस पडू नये यासाठी प्रार्थना करतील. 

सलग तीन षटकार लगावणाऱ्या फलंदाजांत कोण आहे टॉप, तुम्हाला माहित्येय?

इंग्लंडचे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर प्रतिस्पर्धींशी हात मिळवणार नाही, कारण वाचून बसेल धक्का 

'जब इंडिया मे ये लोग आयेंगे, तब...' विराट कोहलीच्या धक्कादायक विधानानं खळबळ

टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन

न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!

ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता...

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतद. आफ्रिकाइंग्लंडआॅस्ट्रेलियाआयसीसी