... आणि काय हवं? 'बर्थ डे बॉय' सचिन तेंडुलकरने पोस्ट केला खास फोटो, The Trouble Maker ने वेधलं लक्ष

Happy Birthday Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर आज आपला ५३वा वाढदिवस साजरा करतो आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:36 IST2026-04-24T13:27:38+5:302026-04-24T13:36:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
happy birthday sachin tendulkar special photo shared with new member dog the trouble maker along with wife anjali tendulkar | ... आणि काय हवं? 'बर्थ डे बॉय' सचिन तेंडुलकरने पोस्ट केला खास फोटो, The Trouble Maker ने वेधलं लक्ष

... आणि काय हवं? 'बर्थ डे बॉय' सचिन तेंडुलकरने पोस्ट केला खास फोटो, The Trouble Maker ने वेधलं लक्ष

Happy Birthday Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज ५३वा वाढदिवस आहे. जगभरातील चाहते आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या खास दिवशी सचिनने सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचा एक अतिशय प्रेमळ फोटो शेअर केला आहे. या फोटोतील 'द ट्रबल मेकर' या टॅगने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

The Trouble Maker - सचिनच्या कुटुंबातील खास सदस्य

सचिनने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो आपली आई रजनी तेंडुलकर, पत्नी अंजली आणि कुटुंबातील एका सदस्यासोबत दिसत आहे. फोटोमध्ये सचिन आणि अंजली सोफ्याच्या एका टोकाला बसले आहेत. त्यांच्या मांडीवर एक गोल्डन रिट्रीव्हर ब्रीडचा कुत्रा बसलेला आहे. बाजूला सोफ्यावर सचिनची आई रजनी तेंडुलकर बसलेली आहे. सचिनच्या घरगुती वातावरणातील हे साधेपणाने भरलेले दृश्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा खास पैलू उलगडून दाखवते. या फोटोत सर्वांचे लक्ष वेधले ते सचिनच्या मांडीवर बसलेल्या 'The Trouble Maker'ने. सचिनने आपल्या कुत्र्याला हा अतिशय मजेशीर टॅग दिला आहे. गोल्डन रिट्रीव्हर जातीचा हा कुत्रा अतिशय खेळकर आणि उत्साही दिसत आहे. सचिनने आपल्या वाढदिवसानिमित्त या सदस्याची ओळख करून दिली आहे.

सचिनने आपल्या वाढदिवसाचा दिवस अतिशय कौटुंबिक आणि आनंदात घालवला असल्याचे या कॅप्शनवरून दिसून येते.

कुटुंबाचा साधेपणा, भक्तिमय वातावरण

फोटोमध्ये सचिनने शेअर केलेल्या घरातील एका कोपऱ्यात अनेक देवादिकांचे फोटो लावलेले दिसत आहेत. यामध्ये गणपती, विठ्ठल-रखुमाई आणि इतर हिंदू देवादिकांचे फोटो अतिशय भक्तीभावाने सजवलेले आहेत. सचिनच्या घरी नेहमीच भक्तिमय वातावरण असल्याचे या फोटोवरून दिसून येते.

दरम्यान, सचिनच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्स संघाने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सचिनच्या कारकिर्दीतील काही क्षणचित्रे आणि त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. सचिनच्या चाहत्यांनीही या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title : सचिन तेंदुलकर का जन्मदिन: पारिवारिक फोटो में दिखा 'द ट्रबल मेकर'.

Web Summary : सचिन तेंदुलकर ने अपना 53वां जन्मदिन परिवार के साथ मनाया, जिसमें उन्होंने 'द ट्रबल मेकर' नाम के अपने कुत्ते के साथ एक प्यारी तस्वीर साझा की। तस्वीर में सचिन का सरल घरेलू जीवन और भक्तिमय कोना दिखाई देता है।

Web Title : Sachin Tendulkar's birthday: Family photo features 'The Trouble Maker'.

Web Summary : Sachin Tendulkar celebrated his 53rd birthday with family, sharing a heartwarming photo featuring his dog, playfully labeled 'The Trouble Maker'. The picture reveals a glimpse into Sachin's simple home life, complete with a devotional corner.