विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?

Glenn Maxwell Retires: ग्लेन मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:39 IST2025-06-02T12:38:33+5:302025-06-02T12:39:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Glenn Maxwell Retires: Glenn Maxwell suddenly announces his retirement; What is the reason..? | विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?

विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?

Glenn Maxwell Retires: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३६ वर्षीय मॅक्सवेलने त्याच्या १२ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी केल्या. ऑस्ट्रेलियाला दोनदा (२०१५ आणि २०२३) एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात मॅक्सवेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॅक्सवेलने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दमदार एकदिवसीय कारकिर्दीचा शेवट
मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी १४९ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ३३.८१ च्या सरासरीने ३९९० धावा केल्या. या दरम्यान, त्याने ४ शतके आणि २३ अर्धशतके केली. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची नाबाद खेळी होती. ही एकदिवसीय इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. मॅक्सवेलने गोलंदाजीतही योगदान दिले असून, आपल्या कारकिर्दीत ७२ बळी घेतले आहेत.

मॅक्सवेलने निवृत्तीबद्दल काय म्हटले?
निवृत्तीची घोषणा करताना मॅक्सवेल म्हणाला, 'परिस्थितीनुसार शरीर साथ देत आहे. मी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्याशी २०२७ च्या विश्वचषकाबद्दल चर्चा केली. मी त्यांना सांगितले की, मला वाटत नाही की, मी त्यात यशस्वी होऊ शकेन. आता माझ्या जागी येणाऱ्या नवीन खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करावे.'

विश्वचषकातील ऐतिहासिक खेळी
२०२३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध ७ बाद ९१ होता, तेव्हा मॅक्सवेलने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दुखापतग्रस्त असूनही त्याने संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात मॅक्सवेलने १२८ चेंडूत नाबाद २०१ धावा केल्या होत्या. त्यात २१ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. या दरम्यान त्याने कर्णधार पॅट कमिन्स (१२*) सोबत आठव्या विकेटसाठी तब्बल २०२* धावांची भागीदारी करत २९२ धावांचे लक्ष्य गाठले  होते. पुढे ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून विश्वचषक आपल्या नावावर केला होता. 

Web Title: Glenn Maxwell Retires: Glenn Maxwell suddenly announces his retirement; What is the reason..?