Asia Cup Team India Squad : आशिया कप स्पर्धेसाठी १९ ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा होणं अपेक्षित आहे. टी-२० संघाचा नियमित कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालीच संघाची निवड होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या संघातून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात परफेक्ट सेट होणारा अन् भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलला वगळण्यासह ३ मोठे निर्णय बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर घेऊ शकतात, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छोट्या फॉर्मेटमधील संघ बांधणी करताना निवडकर्ते ३ मोठे निर्णय घेणार?
आशिया कप स्पर्धेसाठी संघ निवडीसाठी BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही उपस्थितीत असेल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, यावेळी छोट्या फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी संघ बांधणी करताना तीन मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
शुबमन गिलला संधी मिळणं 'मुश्किल'
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आशिया कप स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघाच्या ताफ्यात कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलचं नाव वगळण्यात येऊ शकते. शुबमन गिल हा वर्षभर कसोटी क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे टी-२० संघातून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करताना दिसली आहे. हीच जोडीला आशिया कप स्पर्धेसाठी पहिली पसंती दिली जाऊ शकते. यशस्वी जैस्वाल सलामीवीराच्या रुपात तिसरा पर्याय असेल. शुबमन गिलसाठी कोच गंभीरनं फिल्डिंग लावली तर तो खेळेल, नाहीतर तो संघाबाहेर होईल, असेच दिसते.
मोहम्मद सिराजचं नावही दिसणार नाही
इंग्लंड दौरा गाजवल्यावरही मोहम्मद सिराजला टी-२० संघात स्थान मिळणे कठीण आहे. कारण त्याच्याऐवजी जसप्रीत बुमराहला पसंती मिळेल. अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणासह मोहम्मद शमीवरही विश्वास दाखवला जाऊ शकतो. त्यामुळे या गर्दीत सिराज मागे पडल्याचे पाहायला मिळू शकते.
श्रेयस अय्यरचं स्थानही धोक्यात?
आयपीएल २०२५ स्पर्धेत मध्यफळीत दमदार कामगिरी केल्यावर श्रेयस अय्यर कमबॅकसाठी सज्ज आहे. पण आशिया कप स्पर्धेत जर मागील काही दिवसांपासून सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करणारा संघ कायम ठेवला तर श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुर्लक्षित होऊ शकतो. तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांना मध्य फळीत तर शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्या अष्टपैलूच्या रुपात संघात स्थान दिले जाऊ शकते.
Web Title: Asia Cup India Squad Ajit Agarkar May Take 3 Bold Decision Shubman Gill Shreyas Iyer Mohammed Siraj Spot Uncertain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.