ICC Women's Cricket World Cup 2025 : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली १३ व्या हंगामातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारतातील चार तर श्रीलंकेतील एक अशा पाच वेगवेगळ्या मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या हंगामात भारतीय महिला संघाकडून मोठी अपेक्षा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्मृती मानधना या दोघींवर संघाला चॅम्पिनयन करण्याची मोठी जबाबदारी असेल. टीम इंडियासमोर गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असेल. त्यांनी ७ वेळा ही स्पर्धा जिंकलीये. याशिवाय इंग्लंड (४ वेळा) आणि न्यूझीलंड (१ वेळा) या संघांनी या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. या तीन संघापैकी एक पुन्हा भारी ठरणार की, भारतासह अन्य नवा संघ यंदाचा हंगाम गाजवणार ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात वर्ल्ड कप स्पर्धेतील संघ अन् स्पर्धेसंदर्भातील सविस्तर माहिती
'लेडीज फर्स्ट'...भारतातील स्पर्धेसह दोन वेळा फायनलशिवाय ठरला विजेता! वर्ल्ड कप स्पर्धेतील रंजक गोष्ट
स्पर्धा कधी होणार?
१३ व्या हंगामातील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रंगणार आहे.
किती संघ अन् कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार सामने?
- यंदाच्या हंगामात एकूण ८ संघ सहभागी आहेत.
- प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळेल (राउंड रॉबिन)
- पॉइंट्स टेबलमधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
पहिल्या क्रमांकावरील संघ चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाविरुद्ध तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील सेमीफायनलचा थरार पाहायला मिळेल. यातील दोन विजेते जेतेपदासाठी अंतिम फेरीत एकमेकांना टक्कर देतील.
कुठं खेळवण्यात येणार सामने?
यंदाच्या हंगामातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने भारत आणि श्रीलंकेतील मैदानात खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जातील. जर पाकिस्तान फायनलमध्ये पोहचला तर फायनल लढतही श्रीलंकेत होईल.
भारतातील कोणत्या मैदानात रंगणार सामने?
गुवाहाटी (ACA Stadium), इंदुर (Holkar Stadium), विशाखापट्टणम (ACA-VDCA Stadium), नवी मुंबई (DY Patil Stadium)
श्रीलंका: कोलंबो (Premadasa Stadium)
सामन्यांचे वेळापत्रक
पहिल्या फेरीत एकूण २८ सामने होतील. २६ ऑक्टोबर, २०२५ रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड ( सकाळी ११ वाजता) हा सामना वगळता इतर सर्व सामने सामने दुपारी ३ वाजता (IST) सुरू होतील.
- सेमी-फायनल: २९ आणि ३० ऑक्टोबर, २०२५
- फायनल : २ नोव्हेंबर २०२५, नवी मुंबई किंवा कोलंबो
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ८ संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावळ, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, उमा चेत्री, रेनुका सिंह ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, स्री चरनी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड
राखीव खेळाडू : तेजल हासबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा, मिन्नु मणी, सायली सातघरे
अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ॲश गार्डनर, किम गार्थ, हीदर ग्रॅहम, अलाना किंग, फिबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्राथ, सोफी मोलिनेक्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सुथरलंड, जॉर्जिया व्हॉल, जॉर्जिया वेअरहॅम.
निगार सुलताना जोटी (कर्णधार), नाहिदा आक्तर, फरजाना हक, रुब्या हायदर झेलिक, शार्मिन आक्तर सुप्ता, सोभाना मोस्तारी, रितु मोनी, शॉर्ना आक्तर, फहीमा खातुन, राबेया खान, मारुफा आक्तर, फरीहा इस्लाम त्रिस्ना, शांजिदा आक्तर माघला, निशिता आक्तर निशी, सुमैया आक्तर
नॅट सिव्हर-ब्रंट (कर्णधार), एम आर्लॉट, टॅमी ब्यूमाँट, लॉरेन बेल, ॲलिस कॅप्से, चार्ली डीन, सोफिया डन्कली, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, सारा ग्लेन, एमी जोन्स, हीदर नाइट, एम्मा लॅम्ब, लिंसी स्मिथ, डॅनी वायट-हॉज
सोफी डिव्हाइन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, फ्लोरा डेव्हनशायर, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, ब्री इलींग, पॉली इंग्लिस, बेला जेम्स, मेलि केर, जेस केर, रोजमेरी मॅयर, जॉर्जिया प्लिमर, लिया ताहुहु
फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली सिद्दीकी (उपकर्णधार), आलिया रियाझ, डायना बैग, एयमन फातिमा, नश्रा संधू, नतालिया परवेज, ओमैमा सोहेल, रमीण शमीम, सदफ शमास, सादिया इक्बाल, शावाल झुल्फिकार, सिद्रा अमीन, सिद्रा नवाझ, सैयदा अऱूब शाह
राखीव खेळाडू : गुल फरोझा, नजीहा अल्वी, तुबा हसन, उम्म-ए-हानी, वहिदा अख्तर
लॉरा वूल्वार्ड्ट (कर्णधार), आयाबोंगा खाका, क्लोई ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, मॅरिझान कप्प, ताझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉन्कुलुलेको म्लाबा, ॲनेरी डर्क्सन, ॲनेके बोश, मसाबाटा क्लास, सुन लुस, कराबो मेसो, तुमी सेखुखुने, नॉन्डुमिसो शांगासे
राखीव खेळाडू: मियाने स्मिट
चमारी अटापथ्थु (कर्णधार), हसिनी पेरेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिथा समरविक्रमा, कवीशा दिल्हारी, निलाक्षिका सिल्वा, अनुश्का संजीवानी, इमेशा दुलानी, देवमी विहांगा, पियुमी वथ्साला, इनोका रानावीरा, सुगंडिका दसनायका, उदेशिका प्रभोदनी, माल्कि मदारा, अचिनी कुलासूरिया
राखीव खेळाडू : इनोशी फर्नांडो