Join us

INDU19 vs JPNU19 : सेंच्युरीसह भारतीय कॅप्टनची तिलक वर्मा-संजू सॅमसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

इथं पाहा १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 14:31 IST

Open in App

India U19 vs Japan U19 Mohamed Amaan Smash Century  :१९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील जपान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या मोहम्मद अमान याने नाबाद शतकी खेळी केली. त्याने  ११८ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. कॅप्टनच्या या क्लास खेळीच्या जोरावर भारतीय संघानं जपान विरुद्धच्या सामन्यात निर्धारित ५० षटकात ६ बाद ३३९ धावा केल्या आहेत. या शतकी खेळीसह मोहम्मद अमान याने तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल या स्टार क्रिकेटर्सच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.

तिलक वर्मासंजू सॅमसन यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

अंडर १९ आशिया कप स्पर्धेत शतक झळकावणारा मोहम्मद अमान हा भारताचा ११ वा शतकवीर आहे. या यादीत टीम इंडियातील स्टार विकेट किपर बॅटर संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, देवदत्त पडिक्कल या स्टार क्रिकेटर्सचाही समावेश आहे. या क्लबमध्ये आता मोहम्मद अमान याची एन्ट्री झालीये.

या तिघांच्या खात्यात प्रत्येकी २-२ शतकांची नोंद 

विजय झोल हा भारतीय अंडर १९ संघाकडून आशिया कप स्पर्धेत शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज आहे. त्याने २०१२ च्या हंगामात पाकिस्तान अंडर १९ संघाविरुद्ध १०९ चेंडूत १०९ धावांची नाबाद खेळी साकारली होती. याच हंगामात उन्मुक्त चंद याने दोन शतके झळकावली होती. श्रीलंकेविरुद्ध त्याने ११६ चेंडूत ११६ धावांची खेळी केली होती. तर पाकिस्तान विरुद्ध त्याच्या भात्यातून १२१ धावांची खेळी आली होती. १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा विजय झोल, उत्मुक्त चंद आणि हिमांशू राणा यांच्या नावे आहे. या तिघांनी प्रत्येकी दोन दोन शतके झळकावली आहेत. 

अंडर १९ आशिया कप स्पर्धेत शतक झळकावणारे भारतीय बॅटरची यादी

  • विजय झोल १०९ धावा विरुद्ध पाकिस्तान (२०१२)
  • उन्मुक्त चंद ११६ धावा विरुद्ध श्रीलंका (२०१२)
  • उन्मुक्त चंद ११६ धावा विरुद्ध पाकिस्तान (२०१२)
  • अखिल हेरवाडकर १११ धावा विरुद्ध युएई (२०१३)
  • विजय झोल १०० धावा विरुद्ध पाकिस्तान २०१४
  • संजू सॅमसन १०० धावा विरुद्ध पाकिस्तान २०१४
  • हिमांशू राणा १३० धावा विरुद्ध अफगाणिस्तान (२०१६) 
  • हिमांशू राणा  १०७ धावा विरुद्ध मलेशिया (२०१७)
  • यशस्वी जैस्वाल १०४ धावा विरुद्ध नेपाळ (२०१८)
  • अनुज रावत १०२ धावा विरुद्ध युएई (२०१८)
  • देवदत्त पडिक्कल १२१ विरुद्ध युएई (२०१८)
  • तिलक वर्मा ११० विरुद्ध पाकिस्तान (२०१९)
  • हरनूर सिंग १२० धावा विरुद्ध युएई (२०२१)
  • मोहम्मद अमान ११९ नाबाद विरुद्ध जपान (२०२४)
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघजपानएशिया कप 2023संजू सॅमसनतिलक वर्मादेवदत्त पडिक्कलयशस्वी जैस्वाल