Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?

Womens Emerging Asia Cup postponed: महिला एमर्जिंग आशिया चषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:05 IST2025-06-02T18:04:31+5:302025-06-02T18:05:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
2025 Womens Emerging Asia Cup postponed | Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?

Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?

महिला एमर्जिंग आशिया चषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. या स्पर्धेची दुसरी आवृत्ती येत्या ६ जून पासून श्रीलंकेत खेळवण्यात येणार होती. परंतु, चिकनगुनिया या विषाणूजन्य आजाराच्या प्रसारामुळे आणि हवामानामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्पर्धेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 

आशियाई क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी महिला इमर्जिंग आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली. आशियाई क्रिकेट परिषदेने म्हटले आहे की, श्रीलंका क्रिकेटने त्यांच्या क्षेत्रातील प्रतिकूल हवामान आणि आरोग्याच्या चिंतांमुळे या स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली. त्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी श्रीलंकेत चिकनगुनियाला महामारी घोषित करण्यात आले. कँडीत चिकनगुनियाचे हजारो रुग्ण आढळले. त्यामुळे खबरदारी म्हणून एमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित करण्यात आली.

एमर्जिंग महिला आशिया चषकाची पहिली आवृत्ती २०२३ मध्ये खेळवण्यात आली. हाँगकाँगमध्ये खेळवण्यात आलेली ही स्पर्धा भारताने जिंकली. अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाला ३१ धावांनी हरवून भारत अ संघाने विजेतेपद पटकावले. भारत अ, बांगलादेश अ, पाकिस्तान अ, श्रीलंका अ, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, यजमान हाँगकाँग आणि मलेशिया या स्पर्धेत सहभागी झाले होते.

Web Title: 2025 Womens Emerging Asia Cup postponed