IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला!

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:08 PM2021-04-27T21:08:22+5:302021-04-27T21:08:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : AB Devilliers completed 5000 runs in IPL history, RCB finishes with in 171/5    | IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला!

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांसमोर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे फलंदाज माघारी परतले असताना एबीनं रजत पाटीदार सह संघाचा बेस पक्का केला. त्यान आजच्या सामन्यात ४०वे आयपीएल अर्धशतक पूर्ण करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं मोठी धावसंख्या उभी केली. IPL 2021 : RCB Vs DC T20 Live Score Update

विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांचे संघ आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडत आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं  ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ( Royal Challengers Banglore) साजेशी सुरुवात करता आली नाही. आवेश खाननं चौथ्या षटकात विराट कोहलीला ( १२) आणि इशांत शर्मानं पाचव्या षटकात देवदत्त पडीक्कलला ( १७) माघारी पाठवले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५)  माघारी जाण्यास भाग पाडले. RCBनं १० षटकांत ३ बाद ६८ धावा केल्या होत्या. RCB Vs DC, RCB Vs DC live score, IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या राखीव गोलंदाजाला RCB नं केलं करारबद्ध, केन रिचर्डसनला केलं रिप्लेस!


एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदारला आज संधी मिळाली आणि त्यानं चांगला खेळ करून कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पण, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् तो २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या.  IPL 2021, IPL 2021 latest news, RCB Vs DC IPL Matches


एबी डिव्हिलियर्सची विक्रमी कामगिरी...
एबीनं आयपीएलमध्ये ५००० धावांचा पल्ला ओलांडला. डेव्हिड वॉर्नर याच्यानंतर आयपीएलमध्ये ५०००+ धावा करणारा तो दुसरा परदेशी आणि एकूण सहावा फलंदाज ठरला. हा पल्ला सर्वात जलद पार करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. वॉर्नरनं १३५ डावांत, कोहलीनं १५७ डावांत आणि एबीनं १६१ डावांत हा पराक्रम केला. एबीनं सर्वात कमी ३२८८ चेंडूंत पाच हजार धावांचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये १५०+च्या स्ट्राईक रेटनं ५००० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. ( Of the six players to score 5000 IPL runs, AB de Villiers is the third fastest to the mark after Warner and Kohli) 

Web Title: IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : AB Devilliers completed 5000 runs in IPL history, RCB finishes with in 171/5   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.